आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच राज्‍यांमध्‍ये सुरू झाली रोमिंग फ्री सेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी एअरटेलने मोफत रोमिंग सेवेची सुरूवात केली आहे. कंपनीने सध्‍यातरी फक्‍त पाच राज्‍यांमध्‍येच ही सेवा सुरू केली आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल (कोलकाता वगळता) या राज्‍यांचा समावेश आहे.

रोमिंग फ्री सेवेचा फायदा घेण्‍यासाठी मोबाईल युजर्सला 21 रूपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्‍यानंतर युजर्सला या पाच राज्‍यांमध्‍ये 30 दिवसांपर्यंत फ्री इनिकमिंगचा फायदा उठवता येईल.

विशेष म्‍हणजे रोमिंगदरम्‍यान एअरटेल दिल्‍लीमधील आपल्‍या ग्राहकांकडून इन‍कमिंग आणि लोकल आऊटगोईंगवर एक रूपया प्रति मिनिट शूल्‍क आकारते. तर एसटीडी कॉलसाठी 1.5 पैसे प्रति सेकंद शूल्‍क घेते.

सरकारने मार्च 2013 पासून देशभरात रोमिंग फ्री सेवा सुरू करण्‍याची डेडलाईन दिली होती. मोबाईल कंपन्‍यांकडून पूर्ण तयारी न झाल्‍यामुळे दूरसंचार मंत्री कपिल सिब्‍बल यांनी ही डेडलाईन वाढवली होती. नव्‍या डेडलाईननुसार यावर्षी ऑक्‍टोबरपासून ग्राहकांची रोमिंगच्‍या कटकटीपासून मुक्‍तता होईल.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, रोमिंग फ्री सेवेची मोबाईल कंपन्‍यांकडून चाचणी घेण्‍यात येत आहे. येत्‍या काही महिन्‍यांमध्‍ये ही चाचणी पूर्ण होईल.