आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rochi And Puritech Company Starts New Plant Of Diesel Filter Which Prohibit Posinious Element

रोची-प्युरीटेक उभारणार डिझेलमधून निघाणा-या विषारी कणांना रोखणारा फिल्‍टर प्रकल्‍प

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डिझेल वापरातून निघणारे विषारी कण हवेत जाण्यापासून रोखणारी फिल्टर यंत्रणा उत्पादन करणारी रोची इंजिनिअर आणि जर्मनीतील प्युरीटेक यांनी एकत्र येउन पुण्याजवळ नवा कारखाना उभारण्याचे ठरविले असून त्यासाठी ५५ कोटी रुपये येत्या पाच वर्षात गुंतविले जाणार आहेत.

भारतात प्रदूषण नियंत्रणाचे युरो -४ निकष अद्याप अंमलात आले नसल्याने पहिल्या टप्प्यात आशिया, आफ़्रिका आणि पश्चिमेकडील काही देशात पुणे प्रकल्पातून निर्यात केली जाणार आहे अशी महिती प्युरीटेकचे व्यवस्थापकीय संचालक बर्नार्ड काहलर्ट आणि अल्कोर फंडाचे मुख्याधिकारी जॉर्ज मोलाकल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, रोची कंपनीच्या पिरंगुट येथील कारखान्यात फिल्टर तयार केले जाणार आहेत. नव्या कंपनीत ७४ टक्के हिस्सा रोचीचा तर २६ टक्के हिस्सा प्युरीटेकचा असेल. वर्षाला दोन लाख फिल्टर उत्पादन क्षमता आहे. ट्रक, बस, जहाजे यापासून खाण उद्योग, बांधकाम या क्षेत्रात वापरल्या जाणा-या डिझेलवरील यंत्रात हे फिल्टर उपयोगी ठरतात. भारतात सध्या १३ शहरात युरो -३ निकष आहेत. जेव्हा देशभर युरो -४ निकष लागू होतील त्यावेळी आम्ही उत्पादन क्षमता विस्तार करण्‍यात येणार आहे.
(छायाचित्रात प्‍युरिटेकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बर्नार्ड काहलर्ट आणि रोचीचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी प्रदीप खरेकर.)