आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्यासंबंधी व्यावहारिक बाबींकडे लक्ष द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कोणत्याही स्वरूपाचा विमा उतरवण्याच्या विचारात असाल, तर विम्यासंबंधी काही मूलभूत नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. या वेळी अशाच मूलभूत नियमांविषयी माहिती घेऊया. आयुर्विमा, साधारण विमा आणि समुद्री विमा या सर्वांसाठी हे नियम समान रूपाने लागू होतात. मात्र, विमा नियामक इर्डाच्या नियमांच्या चौकटीत काम करताना यात काही प्रमाणात व्यावहारिक फरक पडू शकतो.
0नुकसान भरपाई : कोणत्याही स्वरूपातील नुकसानीची भरपाई व्हावी हा विम्याचा मुख्य उद्देश असतो. याचाच अर्थ विमा हा लाभासाठी उतरवला जात नाही. विम्याकडे जोखीम व्यवस्थापन आणि संभाव्य नुकसानीचा अंदाज देणारे एक साधन म्हणून पाहावे. उदाहरणार्थ विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणारी नुकसान भरपाई आणि सुरक्षा अशा स्वरूपात त्याकडे पाहावे.
0अंशदान : एकाच प्रकारच्या जोखमीसाठी जेव्हा एखाद्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त विमा पॉलिसी असतील, तर हा नियम लागू होतो. एकाच प्रकारच्या नुकसानीसाठी अनेक विमा कंपन्यांकडून क्लेम घेता येत नाही, असे हा नियम सांगतो. विविध स्वरूपाच्या पॉलिसीअंतर्गत एकाच जोखमीची नुकसान भरपाई देणार्‍या विमा कंपनीत नुकसान भरपाईची वाटणी करणे हा या मागचा उद्देश आहे.
0 विश्वास : विमा हा दोन पक्षांतील करार असतो. म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील हा करार असतो. विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात योग्य परस्पर संबंध आणि दृढ विश्वास असावा, असे हा नियम सांगतो. यानुसार विमाधारकाची सद्य:स्थितीबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी विमा कंपनी त्या विमाधारकावरच अवलंबून असते. समजा तुम्ही आरोग्य विमा उतरवत असाल, तर सर्व प्रकारची माहिती विमा कंपनीला देणे तुमचे कर्तव्य आहे.
0 विमायोग्य पात्रता : जेव्हा एखाद्या बाबीचा मालकी हक्क किंवा त्याचे आर्थिक अधिकार त्या व्यक्तीकडे असेल, तरच ती व्यक्ती विमा घेण्यासाठी पात्र असते, असे हा नियम सांगतो. उदाहरणार्थ, तुम्ही स्वत:साठी तसेच तुमच्यावर अवलंबून असणार्‍या कुटुंबातील सदस्यांचा विमा उतरवू शकता. मात्र, ताजमहालचा विमा तुम्हाला उतरवता येणार नाही.
0 सब्रगेशन : विमाधारकाच्या क्लेमवर अधिकार सांगणार्‍या पक्षाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार या नियमामुळे विमा कंपनीला मिळतो. उदाहरणार्थ, क्ष व्यक्तीच्या चुकीमुळे विमाधारकाला अपघात झाला व त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले, तर त्या क्ष व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार सब्रगेशनमुळे विमा कंपन्यांना मिळतो.
0 लॉस मिनिमायझेशन : विमा संरक्षण असले तरी कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी विमाधारकानेही सजग राहावे, असे हा नियम सांगतो. उदाहरणार्थ, विमाधारकाच्या घराला आग लागली, तर ती आग विझविण्यासाठी प्रयत्न करून कमीत कमी नुकसान होईल यासाठी विमाधारकाने प्रयत्न करायला हवेत.
0 तत्कालीन कारण : जेव्हा अनेक कारणांमुळे नुकसान होते, तेव्हा विमा कंपनीला देणे मागण्यासाठी तत्कालीन कारण द्यावे, भूतकाळातील जुन्या बाबी उगाळत बसू नये, असे हा नियम सांगतो. ज्या वेळी अनेक कारणांमुळे नुकसान होते आणि ही सर्व कारणे विमा संरक्षणाच्या र्मयादेत येत असतील, त्या वेळी हा नियम लागू असतो.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत. rohit.shah@dainikbhaskargroup.com