आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 28 व्या वर्षी ही तरूणी बनली CEO, भारतातील HCL कंपनीची कमात तिच्या हातात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रोशनी नादरचा फाइल फोटो)

नवी दिल्लीः एचसीएल ग्रूपचे शिव नादर यांची एकुलती एक मुलगी रोशनी नादर ही वयाच्या 28 व्या वर्षी एचसीएलसारख्या देशातील बड्या कंपनीची सीईओ बनली आहे. दिल्लीतून शालेय शिक्षण घेतलेल्या रोशनीने माध्यमांमधील पदवी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथून घेतली. या दरम्यान ती सीएनबीसी चॅनलमध्ये इन्टर्नसुध्दा होती. पदवी शिक्षणानंतर तिने स्काय न्यूजच्या लंडन येथील कार्यालयात काम केले. मात्र आपल्या वडीलांच्या सांगण्यावरून तिने ही नोकरी सोडली. यानंतर कल्लोग ग्रॅज्यूएट ऑफ मॅनेजमेंट येथून मॅनेजमेंट अँड स्ट्रेटेजी येथून एमबीए केले.
ऑक्टोबर 2008 मध्ये रोशनी परदेशातून भारतात परतली आणि आपल्या वडीलांच्या एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाली. एप्रिल 2009 मध्ये वयाच्या अवघ्या 28 वर्षी रोशनी नादर एचसीएल कॉर्पोरेशनची सीईओ आणि एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर बनली. सुरूवातीला रोशनीने आपले सर्व लक्ष त्यांच्या वडीलांच्या शिव नादर एज्यूकेशन प्रोजेक्टमध्ये लावले.


- एचसीएलचे प्रमुख शिव नादर हे देशातील श्रीमंतांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहेत आणि रोशनी ही त्यांची मुलगी आहे.
- अवघ्या वयाच्या 28 व्या वर्षी रोशनी 5 बिलियन डॉलरच्या HCL ग्रुपची नवी CEO बनली आहे.
- याशिवाय रोशनी शिव नादर फाऊंडेशनचे कामही पाहाते. हे फाऊंडेशन जगभरातील मुलांना शिक्षण देण्याचे काम करते.

पुढील स्लाईडवर पाहा, रोशनी नादर यांचे फोटो...