आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडियन्स: पुण्यातील रुची सांघवीने दिली होती Facebook ला दिशा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'यश' हे कोणासमोर गुढघे टेकत नाही. परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण संपूर्ण जग बदलू शकतो; हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील रुची सांघवी हिने सिद्ध करून दाखवले आहे. 'फेसबुक'च्या माध्यमातून तिने तिच्या आईवडीलांचेच नव्हे तर पुण्याचेही नाव उज्ज्वल केले आहे.

फेसबुकमध्ये पहिली महिला इंजिनिअर म्हणून काम करण्याचाही मान रूचीने मिळवला आहे. सुरुवातील 10 जणांच्या टीममध्ये ती एकमेव महिला इंजिनिअर होती. पुरुष सहकार्‍यांसोबत रात्रंदिवस परिश्रम करून रुचीने फेसबुकच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

फेसबुकमध्ये रजू झाल्यानंतर रूचीने अनेक बदल सुचवले होते. विशेष म्हणजे रूचीने सुचवलेल्या बदलांवर तत्काळ अंमलबजावणीही करण्यात आली होती. उल्लेखनिय म्हणजे 'न्यूज फिड'ची आयडीया ही रुचीच्याच सुपीक डोक्यातील आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, रुचीच्या 'आयडीया'चे जुकेरबर्गकडून स्वागत'