आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबसे छोटा रुपय्या,केवळ डॉलरच नाही तर इतर चलनांचीही रुपयाला भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली - रुपयाची घसरण सध्याही पूर्वीसारखीच असून बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 68.80 वर पोहोचला. रुपयाची आतापर्यंतची ही विक्रमी घसरण आहे. केवळ डॉलरच्या तुलनेतच नव्हे तर इतर चलनांच्या तुलनेतही रुपया वेगाने घसरत आहे.


विदेशी चलन रुपया
०ब्रिटिश पाउंड 106
०युरो 92
०स्विस फ्रँक 75
०कुवेती दिनार 243
०बहरिनी दिनार 182
०ओमानी रियाल 178
०लॅटिव्हियाची लट 130


दोन उपाय : रुपयाच्या अवमूल्यनामुळे तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीत सरकार करणार भागीदारी. आरबीआयने तेल कंपन्यांसाठी डॉलर खरेदीचे वेगळे काउंटर उघडले.


पॅकेज द्या, नोक-या वाचतील : मुख्यमंत्री
रुपयाच्या घसरणीने औद्योगिक क्षेत्रात निराशाजनक स्थिती आहे. राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आहेत. नोक-या वाचवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मी दिल्ली व राज्यातील संबंधितांच्या संपर्कात आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.
विदेशी गुंतवणूकदारांनी आठ दिवसांत एक अब्ज डॉलरची रक्कम काढून घेतली आहे.


निवडणुका घेणे हाच योग्य पर्याय : भाजप
सरकार अर्थव्यवस्थेवरील आपले नियंत्रण गमावून बसले आहे. आम्ही असे सरकार कदापि सहन करू शकत नाही. आता आपल्याला जनतेच्या दरबारातच गेले पाहिजे. आता निवडणुका घेणे हाच या प्रश्नावरील योग्य पर्याय ठरतो.
- यशवंत सिन्हा, माजी अर्थमंत्री


अमेरिका मजबूत होत असताना आपण का कोसळत आहोत?
सरकारच्या अविवेकी धोरणांमुळे देशाला आर्थिक सुनामीला तोंड द्यावे लागत आहे. मला एक कळत नाही की, जेव्हा अमेरिका डळमळत होती तेव्हा सांगितले जात होते की, अमेरिकेच्या दुबळेपणामुळे रुपया घसरतो आहे. आता ते मजबूत होत असताना म्हटले जातेय की गुंतवणूकदार भारतातून आपला पैसा काढून अमेरिकेत गुंतवत आहेत. यामुळेच रुपया घसरत आहे. अमेरिका कोसळली तर आपणही कोसळतो, पण ते मजबूत झाले तरी आपण कोसळतच का राहतो? सरतेशेवटी आपण पैलतीर गाठण्यासाठी अमेरिकेची शेपटी का धरली आहे? जर धरलीही असेल तर तीरावर का पोहोचत नाहीये? मध्येच का बुडतोय?
-गुरुदास दासगुप्ता, भाकप नेते


त्यातच चिदंबरम यांनाच दिशा ठाऊक नाही
खुद्द अर्थमंत्री पी. चिदंबरम हेच दिशाहीन दिसत आहेत. यावरूनच काँग्रेसच्या दिशाहीनतेचा अंदाज येऊ शकतो. 2009 ते 11च्या दरम्यान घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असे ते मंगळवारी म्हणाले. या काळात प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. चिदंबरम यांनी प्रणव यांचे नाव घेतले नाही. परंतु देशावरील संकटाच्या या काळात चिदंबरम जरी निखळ खरे काय तेच बोलत असतील. असे असले तरीदेखील देशाला त्यांच्याकडून अशा आरोपाची अपेक्षा आहे काय? देशाला काहीतरी नवी दिशा त्यांनी दाखवावी, असेच देशाला वाटते.


तर मग माझ्या खिशातील 500 रुपये आता 344 झाले?
नाही. असेही होत नाही. तुमच्या खिशातील 500 रुपये सध्याही 500 रुपयेच आहेत. परंतु तुम्ही जर आजच आयात केलेली एखादी वस्तू खरेदी करत असाल, तर मात्र तुमच्याजवळील 500 रुपयांची किंमत नक्कीच 344 रुपयेच असेल. ती वस्तू तुम्हाला तेवढी महागात पडेल. पेट्रोल, डिझेलबाबत हेच सूत्र काम करील. याच कारणामुळे येत्या चार-आठ दिवसांत डिझेल 4 ते 5 रुपयांनी महाग होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. तेल कंपन्यांनी तसा दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. सर्वसामान्यांवर या अवमूल्यनाचा अशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो.


यंदा दरमहा सरासरी 3 टक्के घसरला रुपया
2.50 रुपयांपर्यंत दिवसभरात रुपयाची घसरण होऊ लागली. 18 वर्षांनंतर (1995) अशी परिस्थिती आली.
26 ' 8 महिन्यांतील घसरण
बुधवारी 3.8 टक्के, आठवड्यात 8.1, महिन्यात 12.2 आणि 15 जुलैनंतर (या काळात रुपया सावरण्यासाठी पावले उचलली) 13 टक्के घसरला रुपया.


असा वेग ?
10 ऑगस्ट 2011 नंतरची घसरण 52.04 '
1 जानेवारी 2013 नंतरची घसरण
26.05 '
आता ही पावले उचलण्याची शक्यता


सोने तारण ठेवा...
1991 प्रमाणे सोने तारण ठेवण्याचा पर्याय. त्यासंबंधी सरकार विचार करत आहे. भारताकडे सध्या 31 हजार टन सोने आहे.
किंवा परकीय कर्ज घ्या..
याला सॉव्हरिन बाँड जाहीर करणे म्हणतात. आजवर अशी स्थिती आलेली नाही. पण तसे झाले तर देशाची पत, मानांकन घसरेल.
डिझेल होऊ शकते पाच रुपयांनी महाग
पावसाळी अधिवेशन 6 सप्टेंबरला संपत आहे. त्यानंतर तेल कंपन्या रुपयाचे कारण सांगत डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याच्या तयारीत.
दोन दिवसांत सोने 5% महाग


बुधवारी सोने महागले
1900 रुपयांनी
34,500 रुपये तोळा. दागिन्यांचे सोनेही 828 रुपये महाग होऊन 31,075 वर
चांदी 3700 रुपये महाग, 58,500 रुपये प्रतिकिलो.
दोन दिवसांत सोने 7470 रुपये महागले, चांदी
9% महागली