आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाने ओलांडली \'साठी\', डॉलरविरुद्ध नवा निचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉलरविरुद्ध रुपयाची घसरण सुरुच आहे. आज रुपयाने साठी ओलांडत 60.35 ही ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. त्‍यामुळे अर्थव्‍यवस्‍थेबाबत चिंता व्‍यक्त होत आहे.

गेल्‍या काही आठवड्यांपासून रुपयाची सातत्‍याने घसरण सुरु आहे. गेल्‍याच आठवड्यात रुपयाने 59.90 ही पातळी गाठली होती. त्‍यानंतर रुपया जवळपास 2 रुपयांनी सावरला होता. परंतु, पुन्‍हा घसरण झाली. आज सकाळीच रुपया 59.78 वर उघडला होता.

परदेशी संस्‍थांनी भारतातून काही महिन्‍यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात पैसा काढला आहे. याचाही रुपयाच्‍या घसरणीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच सलग सहाव्‍या दिवशी डॉलर जगभरातील चलनांच्‍या तुलनेत वधारला. त्‍यामुळे तुलनेत रुपया कोसळला. अमेरिकेच्‍या फेडरल रिझर्व्‍हने आर्थिक सुधारणांचे संकेत दिले आहेत. आर्थिक सवलती कमी करण्‍यात येणार आहे. याचाही परिणाम रुपयावर झाला.

रुपयाची घसरण झाल्‍यामुळे आयात महागणार आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसही महागण्‍याची शक्‍यता आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलची किंमत 2 रुपयांनी वाढविण्‍यात आली होती. याशिवाय आयात होणा-या अनेक वस्‍तू महाग होतील.