आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाची पासष्टी पार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या दुस-याच दिवशी ,भारतीय शेअर बाजाराने 700 अंकांची घसरण करून दोन वर्षातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली. सध्या घसरण हा एकच शब्द भारतीय अर्थव्यवस्थेला समान अर्थी वापरला जाऊ शकतो. GDP चा मागील दोन तिमाहीचा वाढीचा दर हा 10 वर्षातील नीचांक आहे, रुपयाने 65 अंकाला स्पर्श करून पांढरे निशाण दाखवले व औद्योगिक विकासदराने सर्व सीमा पार करून नीचांक केला. महागाईबद्दल आपल्यासारख्या नोकरदार वर्गाला सांगायची गरज नाही. वाढती व्यापारी तूट आणि खर्च याबाबत फारसे आशादायी चित्र नाही. सध्याचा या भारतीय आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब रुपया आणि डॉलरच्या व्यवहारावर दिसून येते.


या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि या सगळ्याचा आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावरचा परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. रुपयाच्या अवमूल्यनाला कारणीभूत असणा-या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे जीडीपीमधील घसरण ( सध्या भारताचा विकास दर 5 % च्याही खाली आहे. दुसरी महत्त्वाची बाब ही अमेरिकन Federal बँकेशी निगडित आहे ). मागील महिन्यात Fed बाजारातील dollar चा पुरवठा काढून घेण्याबाबत सूतोवाच केले आणि जगभरातील चलन दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला. देशाच्या चलनाचा दर हा त्या देशाची आर्थिक स्थिती आणि ज्या देशाबरोबर तुलना केली जाते त्या देशाच्या आर्थिक बाबीवर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची सुधारत चाललेली स्थिती आणि भारताच्या सध्याच्या स्थितीचे प्रतिबिंब रुपयाच्या दरावर पडत आहे.


अमेरिकन Fed सूतोवाच आज न उद्या होणार याची कल्पना होती. 2008 च्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन सरकारने केलेली मदत काढून घेणे याचा अर्थ अर्थव्यवस्था सुधारत आहे असा होतो. अमेरिकेतील श्रीमंत व्यापारी आणि ब्रोकर यांची भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक आहे. स्वत:च्या देशात परत जाण्यासाठी या गुंतवणूकदारांनी dollar ची मागणी केली आणि dollar चा भाव वधारला. परकीय चलनावर कमी प्रमाणात नियंत्रण असल्याने फइक आणि सरकारने रुपयाची मागणी कशी वाढेल याचे उपाय सुरूकेले. मात्र ते रुपयाची घसरण रोखू शकले नाहीत. फइक च्या उपायांचा परिणाम व्याज दरवाढीवर झाला. रुपयाची मागणी वाढावी यासाठी फइक ने रुपयाचा पुरवढा कमी केला. मात्र त्यामुळे व्याजदर वाढले आणि रुपयावर विशेष परिणाम झाला नाही. भारताचा विकासदर 5 % च्या खाली घसरणे परदेशी गुंतवणूक दरासाठी चिंतेची बाब ठरत आहे. विकास दरातील घसरणीचा परिणाम हा देशाच्या व्यापारावरही होतो. भारताची निर्यात ( export ) कमी होत आहे आणि आयात ( import ) वाढत आहे . सोप्या भाषेत, आपण dollar जास्त खर्च करत आहोत आणि कमी प्रमाणात कमावत आहोत. रुपयाचा सध्याचा दर आपली अर्थव्यवस्था स्वीकारू शकत नाही. कारण dollar चा दर हा आपली आयातीची किंमत वाढतो. सोने, तेल या आपल्या आयातीमधील प्रमुख बाबी आहेत. फइक आणि सरकारच्या प्रयत्नांनी कदाचित रुपयाचा दर सुधारेलही, मात्र ती सुधारणा तात्पुरती आणि मामुली असेल. अमेरिकन Fedचा पुरवठ्यावर नियंत्रण आणल्यावर dollar ची मागणी वाढून रुपयाची घसरण होऊ शकते. रुपयाची मागणी प्रोत्साहित करण्यासाठी विकासदर वाढवणे या उपायाचा विचार करणे गरजेचे आहे. विकासदर वाढणे ही जरी दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असली तरी चलनामध्ये स्थिरता आणण्यासाठी ही महत्त्वाची गरज आहे.


आज रुपयांनी आणि भारताने साठी पार केली आहे. साठी पार केलेल्या अनुभवाचे बोल हे महत्त्वपूर्ण आहेत. जागतिकीकरणाची कास धरूनही आर्थिक विकासाला अत्यावश्यक असणा-या बाबीची पूर्तता न केल्याने आज भारताने रुपयाची आणि देशाची आर्थिक वाढीची घसरण स्वीकारली. शेती आणि उद्योगांना चालना न दिल्याने विकासदर खालावला आणि परदेशी गुंतवणूकदारांनी नाराजी प्रकट केली. अमेरिकन फेडच हे निमित्तमात्र. परदेशी गुंतवणूकदारांनी दुस-या एखाद्या आशिया बाजाराकडे नजर केली असती. Dollar हे आंतरराष्‍ट्रीय चलन असल्याने त्याची मागणी कमी होईल अशी आशा बाळगण्यापेक्षा, रुपयाची मागणी कशी वाढेल याकडे नजर टाकणे हिताचे ठरेल. रुपयाची साठी शांतपणे स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थकारणात महत्त्वाची भूमिका कशी मिळेल हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा आज रुपया तर उद्या अजून कुठल्या कारणांनी भारताचे अवमूल्यन होऊ शकते. भारताची निर्यात ( export ) कशी वाढेल, परदेशी गुंतवणूक भारताकडे कशी येईल, शेती आणि उद्योग याचं GDP तील योगदान कसे वाढेल, या प्रश्नांची उत्तरे समजून घेण हे पासष्टीच्या वर आलेल्या रुपयाची आणि 66 व्या वर्षात पदार्पण केलेल्या भारताची गरज आहे.
Yogeshkulkarni07@gmail.com