आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाच्या घसरणीने तेजीला लगाम,सेन्सेक्स : 39 अंकांची वाढ, 5 : 64.30

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलग तिसर्‍या सत्रात 39 अंकांची वाढ नोंदवत सकारात्मक संकेत देणार्‍या सेन्सेक्सच्या तेजीला रुपयाच्या घसरणीचा खोडा बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 110 पैसे गमावत 64.30 ही पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स 38.69 अंकांच्या वाढीसह 18,558.13 वर स्थिरावला. निफ्टी 4.75 अंकांच्या वाढीसह 5476.50 वर बंद झाला.

चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आणखी पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळपासून बाजारात तेजीचे वातावरण होते. एक वेळ सेन्सेक्सने 18,728 अशी पातळी गाठली होती. नंतर मात्र रुपयाच्या घसरणीमुळे तेजीला लगाम बसला. ऊर्जा, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान आणि औषधी कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली. भेलच्या समभागांनी सलग दुसर्‍या सत्रात मोठय़ा वाढीसह बाजारात आघाडी मिळवली.

तेजीचे मानकरी : भेल, स्टरलाइट इंडस्ट्रीज, विप्रो, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, गेल, आयसीआयसीआय बँक

सोने घसरले : मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत तोळ्यामागे 25 रुपयांनी घसरून 31,920 झाली. तर चांदीची किमत किलोमागे 470 रुपयांनी वाढून 54,730 झाली. शनिवारी दोन्ही धातू तेजीने चकाकले होते.