आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरच्या तुलनेत रुपयावरील अरिष्ट लवकरच संपणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनामुळे निराश झालेल्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. रुपयाने 68.85 अंकांचा नीचांक गाठल्यानंतर परकीय चलन बाजारात आता शांतता दिसून येत आहे.

‘फायबोनेक्की रिट्रेसमेंट’ या तांत्रिक विश्लेषण टूलच्या माध्यमातून रुपया सध्याच्या 65 अंकांच्या पातळीवरून 63 रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याचे संकेत आहेत. बार्कलेजचे विश्लेषक हमीश पेप्पर यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत रुपयाने रसातळ गाठला आहे. मात्र आता तो यापेक्षा खालील पातळीवर जाण्याची शक्यता कमीच आहे. इंटरेस्ट फ्चूचर्सशिवाय होणार्‍या सौद्यांची संख्याही घटली आहे. या प्रकारच्या सौद्यांची संख्या गेल्या 19 ऑगस्टरोजी वाढून सुमारे 12 लाखांच्या उच्चांकावर पोहोचली होती. ती आता 8.26 लाखांच्या पातळीवर आली आहे. यामुळेही रुपयात मजबुतीचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणातही रुपयाने नीचांक गाठलेला असून यापुढे तो सुधारत जाईल, असे संकेत मिळाले आहेत. मात्र सुमारे एका वर्षापर्यंत त्यात अमुलाग्र सुधारणांची आशा करता येणार नाही, असेही सर्वेक्षणात म्हटलेले आहे. रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रुपयात मजबूती येत असल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. गेल्या तीन दिवसांत रुपयांत आशादायक सुधारणा झाली आहे.