आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rupee Drops To All time Record Low Of 61.51 Vs Dollar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घसरण थांबता थांबेना, रुपयाने गाठली नवी नीचांकी पातळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्‍ह बँकेने कठोर पावले उचलल्‍यानंतरही रुपयाची घसरण थांबविण्‍यात अपयश आले आहे. रुपयाने आज (मंगळवार) नवी नीचांकी पातळी गाठली. डॉलरच्‍या तुलनेत रुपया 61.51 या पातळीपर्यंत घसरला. यापूर्वी 8 जुलैला रुपया 61.21 इतका खाली घसरला होता.

आज परकीय चलनाचे व्‍यवहार सुरु झाले त्‍यावेळी रुपया 61.05 या पातळीवर उघडला. त्‍यानंतर त्‍यात आणखी घसरण होत गेली. काही दिवसांपूर्वी रुपया सावरला होता. डॉलरच्‍या तुलनेत 58 रुपयांपर्यंत रुपया वधारला होता. मात्र, पुन्‍हा अवमुल्‍यन झाले. बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्‍यामुळे रुपयाची पडझड झाल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले. याचाच अर्थ भारताची आयात वाढली आहे आणि आयातीसाठी खर्चही वाढला आहे.

रुपया पडल्‍यामुळे शेअर बाजारातही घसरण झाली. सेन्‍सेक्‍स सकाळी 10.30 वाजता 194.44 अंकांनी खाली आला होता. जागतिक बाजारपेठेमध्ये इतर महत्त्वपूर्ण चलनांच्या तुलनेत डॉलरची घसरण होत आहे. परंतु, रुपया मात्र डॉलरच्‍या तुलनेत घसरत आहे. भारतासाठी हे चिंतेचे कारण आहे.