आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदीची घसरण सुरूच, रुपयाही आपटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक सराफा बाजारातील नरमाई आणि डॉलरच्या मूल्यात सातत्याने होणारी वाढ याचा दबाव मौल्यवान धातूंच्या किमतीवर कायम आहे. शुक्रवारी राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे १०० रुपयांनी घसरून २५,८०० वर आले. ऑगस्ट २०११ मध्ये सोन्याने ही पातळी दर्शवली होती. चांदी किलोमागे १५० रुपयांनी घटून ३४,९०० वर आली. दिवाळीपासून आतापर्यंत सोन्याच्या किमती तोळ्यामागे २००० रुपयांनी घसरल्या आहेत.
सराफा व्यापा-यांनी सांगितले, रिटेलर्स व ज्वेलर्सकडून मागणीच नसल्याने सोने, चांदीच्या किमतीवर परिणाम होत आहे. जागतिक सराफा बाजारात तर सोने चार वर्षांच्या नीचांकावर आले आहे. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.९० टक्क्यांनी घसरून ११३२.१६ डॉलरवर आले. चांदी औंसमागे २.३ टक्क्यांनी घसरून १५.०६ डॉलर झाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने दिवाळीपासून आतापर्यंत तोळ्यामागे २००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
रुपयाचा तीन आठवड्यांचा नीचांक
आयातदारांकडून डॉलरला आलेल्या चांगल्या मागणीमुळे शुक्रवारी रुपया आपटला. विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २१ पैशांनी घसरून ६१.६२ झाले. हा रुपयाचा तीन आठवड्यांचा नीचांक आहे. अमेरिकेत रोजगार निर्मितीचा दर वाढल्याने डॉलरला चांगली मागणी आली व त्याचा फटका रुपयाला बसला.