आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाची घसरण थांबण्यासाठी रिझर्व्ह बँक विकणार 22 हजार कोटींचे रोखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेश मुद्रा विनियम बाजारातील (फॉरेक्स) अस्थिरता थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. रुपयाला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक दर सोमवारी 22 हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे विकणार आहे. बँकेने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात ही घोषणा करण्यात आली.


मागील दोन महिन्यांपासून रिझर्व्ह बँक फॉरेक्समधील व्यवहारांवर लक्ष ठेवून आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी बँकेने अनेक पावले टाकली. त्यांचा परिणाम आणि बाजारातील रोख निधीची चणचण दूर करण्यासाठी दर सोमवारी सरकारी रोखे विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. लिलाव पद्धतीने विक्री होणा-या रोख्यांबाबत एक दिवस अगोदर पूर्वसूचना देण्यात येणार आहे. बुधवारी रुपयाने 61.30 असा विक्रमी नीचांक गाठला होता. त्याआधी 8 जुलैला रुपया 61.21 असा घसरला होता. त्यानंतर 15 जुलै रोजी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांच्या कर्जाचा बँक रेट दोन टक्के वाढवून 10.25 केला होता. तर 18 जुलै रोजी 2500 कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची विक्री खुल्या बाजारात केली होती. त्यानंतरही रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी विविध पावले उचलली होती.