आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rupee Falling Due To Governmental Malpractices, D.Subbarao Critise

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाच्या घसरणीला सरकारचे दिरंगाईचे धोरण कारणीभूत, डी. सुब्बाराव यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सेवानिवृत्तीला एक आठवडा उरला असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी रुपयाच्या घसरणीला सरकारचे दिरंगाईचे धोरण कारणीभूत असल्याची टीका केली. त्याला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत उत्तर दिले. रुपयावरून सुब्बाराव-चिदंबरम यांच्यात आता चांगली जुंपली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला केंद्राचे सरकार जबाबदार आहे. रुपयाच्या घसरणीला विदेशी नव्हे, तर देशातीलच कारणे अवलंबून असल्याचे सांगत सुब्बाराव यांनी सरकारचे कान उपटले.


रुपयाच्या घसरणीमागे विदेशातील कारणे असल्याचे सरकारने वारंवार सांगितले आहे. सरकारकडून होणा-या या खुलाशाचा सुब्बाराव यांनी गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, रुपयाच्या अवमूल्यनामागे बाहेरील कारणे असल्याचे सांगून सरकार सर्वांची दिशाभूल करत आहे. देशातील संरचनात्मक कमकुवतपणामुळे रुपयाची डॉलरकडून धुलाई होत आहे. अमेरिकच्या फेडरल रिझर्व्हकडे यासाठी दाखवण्यात येणारे बोट हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी सरकारने धोरणात्मक व संरचनात्मक पावले उचलण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अत्यंत मर्यादित अधिकार आहेत.


कडक धोरण हवेच
महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेने अवलंबलेले कडक धोरणावर टीका होते. मात्र, हे धोरण विकासाला बाधा आणणारे नसून विकासाच्या काळजीपोटी अवलंबण्यात आले.भांडवल बाजारात स्थैर्य आणणे हे मध्यवर्ती बँकेचे उद्दिष्ट आहे. डी. सुब्बाराव, गव्हर्नर, आरबीआय