आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Gains Strength Against Dollar And Sensex Also Soars Up By 500 Points

बाजाराला बाप्‍पा पावला: रुपया वधारला, सेन्‍सेक्‍सचीही 20 हजारांपर्यंत भरारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गणेशोत्‍सवामध्‍ये घरोघरी विराजमान झालेला गणपती बाप्‍पा शेअर बाजारासह रुपयालाही पावला. आज (मंगळवार) बाजार उघडताच रुपयाने डॉलरच्‍या तुलनेत 77 पैशांची उसळी घेतली. त्‍यानंतर रुपया आणखी बळकट झाला. रुपया बळकट झाल्‍यामुळे शेअर बाजारावरही सकारात्‍मक परिणाम दिसून झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्‍सेक्‍स 727 अंकांनी झेपावला. राष्‍ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 216 अंकांनी वधारला. सेन्सेक्स 19997 तर निफ्टी 5896 अंकांवर बंद झाला.

परकीय चलन व्‍यवहार शुक्रवारी बंद झाले त्‍यावेळेस रुपयाचे मुल्‍य डॉलरच्‍या तुलनेत 65.24 होते. आज रुपया 64.37 वर उघडला. त्‍यानंतर रुपया आणखी बळकट झाला. रुपयाने 64.17 ची पातळी गाठली. गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीला रुपया कोलमडला होता. परंतु, नवे गव्‍हर्नर रघुराम राजन यांनी सुत्रे हाती घेतल्‍यानंतर कठोर पावले उचलण्‍याचे संकेत दिले होते. त्‍यामुळे रुपयाचे मूल्‍य सुधारताना दिसत आहेत. शुक्रवारी रिझर्व्‍ह बँकेने काही पावले उचलली होती. त्‍याचे परिणाम आज दिसून आले.