आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Hits Life time Low Of 57.54 Vs Dollar In Early Trade

चिंताजनकः डॉलरच्‍या तुलनेत रुपया विक्रमी 57.54 निचांकी पातळीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयाची घसरण चिंताजनक झाली आहे. आज सकाळी परकीय चलन व्‍यवहार सुरु होताच रुपयाने डॉलरच्‍या तुलनेत आतापर्यंतची निचांकी पातळी गाठली. रुपया एका डॉलरच्‍या तुलनेत 57.54 या पातळीवर पोहोचला होता.

व्‍यवहार सुरु होताच रुपया 57.25 या पातळीवर उघडला. परंतु, त्‍यात आणखी घसरण झाली. गेल्‍या वर्षी जूनमध्‍येच रुपयाने 57.32 ही विक्रमी निचांकी पातळी गाठली होती. त्‍यानंतर त्‍यात सुधारण झाली होती. रुपयाने एका वेळेस 53.50 पर्यंत सुधारणा नोंदविली होती. मात्र, गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये त्‍यात सातत्‍याने घसरण झाली आहे. तज्ञांच्‍या मते डॉलर आणखी मजबूत होण्‍याची शक्‍यता आहे. परिणामी रुपया आणखी घसरण्‍याचा अंदाज आहे. यासंदर्भात आरबीआयने त्‍वरित पावले उचलली पाहिजे, अशी अपेक्षा तज्ञांनी व्‍यक्त केली आहे.

रुपयाच्‍या अवमुल्‍यनामुळे तुमच्‍यावर काय होईल परिणाम... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..