आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Increase And Gold Fell Issue In Share Market

रुपया गडगडला, सोने घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, नवी दिल्ली - महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा दबाव गुरुवारी रुपयावर आला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ४५ पैशांनी घसरून ६१.८६ वर आला. हा रुपयाच्या मूल्याचा सात आठवड्यांचा नीचांक आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली. सोने तोळ्यामागे १२० रुपयांनी घसरून २८,३०० वर आले. चांदी किलोमागे ४२० रुपयांनी घटून ३९,१०० झाली.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील नरमाईचा दबाव सोन्याच्या किमतीवर दिसून आला. देशातील ज्वेलर्स व रिटेलर्स यांच्याकडून मागणी घटल्यानेही सोने घसरले. त्यातच डॉलरचे मूल्य वधारल्याने सराफा बाजारात घसरण दिसून आली. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.५ टक्क्यांनी घटून १२७८.२७ डॉलर झाले. लग्नसराईमुळे बुधवारी सोन्याला चांगली मागणी होती. त्यामुळे सोने १२० रुपयांनी वधारले होते. गुरुवारी तोळ्यामागे १२० रुपयांची घसरण झाल्याने सोने पुन्हा पूर्वपदावर आले. औद्योगिक क्षेत्रातून मागणी नसल्याचा परिणाम चांदीच्या किमतीवर झाला.
महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा दबाव गुरुवारी रुपयावर आला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ४५ पैशांनी घसरून ६१.८६ वर आला.
रुपयाचा नीचांक
विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरने रुपयाची धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ४५ पैशांनी घसरून ६१.८६ वर आला. हा रुपयाच्या मूल्याचा सात आठवड्यांचा नीचांक आहे. महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरला चांगली मागणी आली.