आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee May Hamper More After Mittal And Posco Announced Withdraw From India

मित्तल-पॉस्को कंपन्यांच्या प्रकल्प माघारीचा परिणाम रुपयावरही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात आर्सेलर मित्तल आणि पॉस्को या दोन मोठ्या उद्योग कंपन्यांनी देशातील प्रस्तावित पोलाद प्रकल्पांमधून माघार घेण्याची घोषणा केली. परिणामी देशाला 18 अब्ज डॉलरच्या थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मुकावे लागणार आहे. पण त्याचा परिणाम या दोन कंपन्यांपुरताच मर्यादित न राहता इतर क्षेत्रांवर होण्याचा धोका आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन (डीआयपीपी) विभागाच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा परिणाम देशात येऊ पाहणार्‍या नव्या गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. आर्सेलर मित्तल कंपनीने ओडिशातील 50 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प रद्द केला आहे, तर पॉस्को कंपनीने कर्नाटकातील 32 हजार कोटींचा प्रकल्प रद्द केला आहे.

कंपन्यांच्या या निर्णयामुळे एफडीआयच्या मार्गात अडथळे येऊन गुंतवणूकदार निराश होण्याचा धोका आहे. सध्या आर्थिक परिस्थिती असल्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी विदेशी गुंतवणुकीची तातडीने गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या दोन कंपन्यांनी हात आखडता घेणे हा देशासाठी मोठा धक्कादायक निर्णय ठरू शकतो.


पायाभूत सुविधांचे 1000 अब्ज डॉलर कोठून येणार ?
कॉर्पोरेट लॉ फर्म अमरदास मंगलदासचे प्रमुख कृष्णन मल्होत्रा यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ व बंदर विकासासाठी पुढच्या पाच वर्षांत 1000 अब्ज डॉलरची (60 लाख कोटी रुपये) म्हणजे वर्षाला 200 अब्ज डॉलरची गरज आहे.

आर्थिक संतुलन बिघडले तर रुपया सावरणे कठीण
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशी व विदेशी गंगाजळीदरम्यान चांगला समन्वय साधण्याचे काम विदेशी गुंतवणूक करतात. एफडीआयचे नवे प्रस्ताव आले नाहीत आणि आधी आहेत तीच गुंतवणूक परत गेली तर रुपयाची खालावलेली परिस्थिती कशी सुधारणार, हा प्रश्न आहे.