आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Piggybacks On Gains In Share Market, Rises To 60.85

पतधोरणाला बाजाराची सलामी; सेन्सेक्समध्ये 185 अंकांची वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात सलग तिसर्‍यांदा व्याजदर जैसे थे राहिल्याने कंपन्या आणि कर्जदारांच्या पदरात काही पडलेले नाही; परंतु वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू आणि स्थावर मालमत्ता समभागांना मात्र बाजारात तुफान मागणी येऊन सेन्सेक्सने 185 अंकांनी उसळी घेतली. बँकिंग क्षेत्राला पुरेसे खेळते भांडवल उपलब्ध झाल्यामुळे बाजाराने पुन्हा एकदा उभारी घेतली.

बड्या समभागांच्या खरेदीचे पाठबळ मिळाल्यानंतर सेन्सेक्स 184.85 अंकांनी वाढून 25,908.01 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने 62.90 अंकांची कमाई करत 7746.55 पर्यंत वाढ नोंदवली.

हे समभाग वधारले : महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स
हे घसरले : आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, हीरो मोटोकॉर्प