आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rupee Plunges To Historic Low Of 65.72 Vs Dollar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीती अन्‍न सुरक्षेची? रुपयाचा पुन्‍हा नीचांक, 66 पार; सेन्‍सेक्‍सही गडगडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुबई- सरकार आणि रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने लगाम कसल्‍यानंतरही रुपयाची घसरण सुरुच आहे. आज (मंगळवार) रुपयाने पुन्‍हा विक्रमी नीचांकी पातळी गाठली. सकाळी व्‍यवहार सुरु होताच रुपयाने पासष्‍ठी पार केली आणि 65.72 ही नीचांकी पातळी गाठली. त्‍यानंतरही रुपया आणखी घसरुन 66 च्‍या पातळीखाली गेला. दिवसभरात रुपया 176 पैशांनी घसरला. आयातदारांकडून अमेरिकी डॉलरला मोठी मागणी आणि परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) मोठ्या प्रमाणात काढून घेतले जाणारे भांडवल, यामुळे रुपया घसरला. परिणामी मुंबई शेअर बाजारालाही बसला. शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्‍सेक्‍स 600 अंकांनी गडगडला. शेअर बाजार 18000 च्‍या खाली घसरला आणि सोनेही महागले. सोन्‍याची किंमत प्रतितोळा 33 हजार रुपयांपर्यंत झाली.

आयातदार आणि बँकांकडून डॉलरला मागणी वाढल्‍याचा फटका रुपयाला बसला. बाजार उघडताच रुपया 65 च्‍या पातळीवर गेला. त्‍यानंतर त्‍यात सातत्‍याने घसरण होत गेली. रिझर्व्ह बॅंकेने सरकारी बॅंकांमार्फत हस्तक्षेप केल्यामुळे रुपया किंचित सावरला होता. परंतु, त्‍याचा फारसा फायदा झाला नाही. महिन्‍याच्‍या शेवटी डॉलरला मागणी वाढते. तेल आयातदारांना पैसे चुकवायचे असल्‍यामुळे डॉलर खरेदी झाली. त्‍यामुळे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संसदेत निवेदन देताना रुपया लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास व्‍यक्त केला. परंतु, त्‍याचा परिणाम झाला नाही. रुपयाचे अवमूल्यन आणि देशातील चालू खात्यातील तूट (कॅड) वाढत चालल्याने फिच या पतमुल्यांकन संस्थेने पतमुल्यांकन घटवण्याचा इशारा दिला आहे.