आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Volatility Is Set To Impact Prices Of Everyday Items

MONEY... यामुळे घोंघावतेय भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे वादळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वसामान्य जनता आधीच महागाईने बेजार झाली आहे. त्यात अमे‍रिकन डॉलरसमोर भारतीय रुपयाने नांगी टाकल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत आणखी महागाई पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या मे महिन्यापासून रुपयाने 28 टक्क्यांनी गटांगळी खात काही दिवसांपूर्वी तर सत्तरीपर्यंतची ऐतिहासिक पातळी गाठली होती. डॉलरचे बळ दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुपयाची वाईट परिस्थितीकडून धोकेदायक परिस्थितीकडे वाटचाल सुरु आहे. एवढेच नाही तर डॉलरपाठोपाठ ब्रिटिश पौंड (106 रुपये), युरो (92 रुपये), स्विस फ्रँक (75 रुपये), कॅनेडियन डॉलर (65 रुपये), ऑस्ट्रेलियन डॉलर (60 रुपये) आदी जगातील प्रमुख चलनांसमोर रुपयाचे हातपाय गळाले असल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंका तसेच वित्तीय संस्थाना सुचवलेले उपायही या परिस्थितीत प्रभावहीन ठरले आहेत.

भारतीय रुपया आणखी घसरणार, स्थिर राहणार की आणखी मजबूत होणार, हे आता येणारा काळच ठरवणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास देशातील सर्वसामान्य जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? हे वाचण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा..