आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाची आपटी, सोने-चांदी घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - डॉलरच्या तुलनेत सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी रुपयाचे मूल्य घसरले. तिकडे दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, स्टॉकिस्टांकडून सोन्याच्या जोरदार विक्रीचा फटका सोन्याला बसला. सोने तोळ्यामागे 170 रुपयांनी घसरून 28,100 झाले. सोन्याचा हा 10 महिन्यांचा नीचांक आहे. चांदी किलोमागे 50 रुपयांनी स्वस्त होऊन 41,400 झाली.
रुपयाची आपटी : आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा फटका रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांनी घसरून 59.04 वर आला.