आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाची साठी, महागाईच्या गाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉलरला आलेल्या प्रचंड मागणीमुळे रुपयाने आजवरची सर्वात नीचांकी पातळी गाठली. आंतरबँक मुद्रा विनिमय बाजारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत बुधवारी साठीची पातळी ओलांडत 60.72 असा नीचांक नोंदवला. गुरुवारी रुपयात काहीशी सुधारणा होऊन तो 60.35 वर स्थिरावला. मागील दोन दिवसांत रुपयाचे मूल्य 2.5 टक्के, तर सहा आठवड्यांत 10 टक्के घसरले आहे. एक महिन्यापूर्वी रुपया 54.75 या पातळीत होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 62 या पातळीपर्यंत घसरू शकतो, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. रुपयाच्या घसरणीमुळे सर्वांच्या खिशावर ताण येणार आहे. महागाईत भर पडणार आहे.

डॉलर महागल्याचा फायदा कोणाला

एनआरआय : विदेशात राहणारे भारतीय (एनआरआय) डॉलरमध्ये कमावतात. भारतातील नातेवाइकांना ते डॉलर्स पाठवतात. त्याचे जास्त रुपये मिळतात.

निर्यातदार : निर्यातदारांना निर्यात केलेल्या मालाचा मोबदला डॉलरमध्ये मिळतो. तो देशात परावर्तित होताना जास्त रुपये मिळतात.

पर्यटन उद्योग : रुपया घसरल्याने विदेशी पर्यटकांना भारतात येण्यासाठी कमी खर्च लागतो. त्यातून पर्यटन उद्योगाला चालना मिळते.

रुपयाच्या घसरणीची मुलभूत कारणे
मागणी-पुरवठा नियम- रुपयाच्या घसरणीत डिमांड अँड सप्लाय नियम काम करतो.डॉलरची मागणी पुरवठय़ापेक्षा जास्त असल्यास रुपया घसरतो
निर्यात घटणे- निर्यात घटल्यास व्यापारी तूट वाढते. आयातीसाठी डॉलरला मागणी येते
विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) निधीचा उपसा
थेट विदेशी गुंतवणुकीतील घट
कच्च्या तेलाच्या किमती या प्रमुख कारणांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय - काय महागाणर...