आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या चालीवर ठरणार बाजाराची दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण देशातील शेअर बाजाराच्या घसरणीचे कारण बनते आहे. रुपया कमकुवत झाल्याने विदेशी गुंतवणूकदार बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्याची काळजी गुंतवणूकदारांना सतावते आहे. रुपयाच्या घसरणीची भले सरकराला काळजी वाटत नसली तरी उभारणा-या बाजारासाठी ही घसरण सर्वात मोठी आहे. सध्या बाजाराने ती पातळी गाठली आहे, ज्या पातळीवर विदेशी गुंतवणूकदार विक्री करू शकतात. मात्र, अद्याप तसे झालेले नाही.


आकडेवारी पाहिली तर विदेशी गुंतवणूकदारांनी अद्याप समभागांची विक्री केलेली नाही. मात्र, ते कर्जरोखे विकत आहेत. रुपयाच्या घसरणीने चालू खात्यातील तूट वाढण्याच्या शंकेने चिंतेत भर टाकली आहे. त्याबरोबरच रिझर्व्ह बँकेकडून प्रमुख व्याजदर कपातीच्या शक्यतेवर पाणी पडले आहे. येत्या 17 जून रोजी आरबीआय मध्य तिमाही पतधोरणाचा आढावा घेणार आहे. आता बाजाराला सरकारकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. सध्या देशातील शेअर बाजारात भीतीचे वातावरण आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारांतही सतर्कता दिसून येत आहे. तेथेही काही बड्या चलनानी सटोडियांचे मनोबल कमजोर केले आहे. दरम्यान, वैश्विक आर्थिक संकेतही अपेक्षेपेक्षा कमजोर राहिले आहेत. तिकडे अमेरिकेत रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आल्याने फेडरल रिझर्व्हकडून बाँडची खरेदी योजना आणखी काही महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.


अशा परिस्थितीत देशातील शेअर बाजारात सतर्कतेचा कल राहील. रुपयात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत आणि चालू खात्यातील तूट वाढते आहे. यावर आळा बसण्यासाठी सरकारने अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही. या कारणामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे. एक तर्क असाही आहे की, बाजार ब-यापैकी खालच्या स्तरावर आला असून या पातळीवर खरेदी होऊ शकते. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, बाजारातील घसरणीचे पर्व आता संपले आहे. मंगळवारी ज्या पद्धतीने विदेशी फंडांनी समभागांची विक्री केली ती पाहता घसरणीची शक्यता नाकारता येत नाही.
कालच्या दिशेने निफ्टीला पहिला आधार 5751 वर मिळण्याची अपेक्षा आहे. या स्तरावरून निफ्टीने उसळी घेतल्यास शेअर बाजारात एक रिलिफ रॅली येऊ शकते. मात्र, निफ्टी हा स्तर टिकवू शकला नाही तर त्याला पुढील आधार 5712 वर मिळेल. हाही फारसा तगडा आधार नसेल. अधिक व्हॉल्यूमसह या सत्रावर विक्री दिसू शकते. हा स्तर तुटल्यास पुढील आधार 5648 वर मिळण्याची शक्यता आहे. वरच्या दिशेने निफ्टीला पहिला अडथळा 5856 वर होण्याची शक्यता आहे. हा एक नाजूक अडथळा आहे. निफ्टी या पातळीवर बंद झाल्यास आणखी तेजी दिसू शकते. निफ्टीला पुढील अडथळा 5922 वर होईल. त्यानंतर 5991 वर तगडा अडथळा आहे. या पातळीवर निफ्टी बंद झाल्यास बाजाराचा कल बदलला असे समजावे.

शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टूब्रो लिमिटेड आणि एचडीएफसी लिमिटेड चार्टवर उत्तम वाटताहेत. एसबीआयचा मागील बंद भाव 1997.50 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 2034 रुपये आणि स्टॉप लॉस 1942 रुपये आहे. एल अँड टीचा मागील बंद भाव 1403.05 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1428 रुपये, तर स्टॉप लॉस 1371 रुपये आहे. एचडीएफसीचा मागील बंद भाव 831.15 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 844 रुपये, तर स्टॉप लॉस 814 रुपये आहे.


लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.