आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruppe Fall Down; Reserve Bank Make Intervention In Ruppes Depreciation

रुपयाचा विक्रमी नीचांक; अवमूल्यन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारी विक्रमी नीचांक नोंदवला. रुपयाने 24 पैसे गमावत 58.39 ची पातळी गाठली. रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागला. विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली. इंट्रा-डे व्यवहारात एकवेळ रुपया 58.98 अशा नीचांकापर्यंत गडगडला होता. त्या वेळी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून रुपयाची घसरगुंडी थांबवली.

इंडसइंड बँकेचे रिसर्च हेड मोजेस हार्डिंग यांनी सांगितले, आयात-निर्यातीवर परिणाम करणारी पातळी रुपयाने गाठल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला. त्यामुळे रुपयाची घसरण आटोक्यात राहिली. वित्त सचिव अरविंद मायाराम यांनी मात्र ही घसरगुंडी एक प्रकारचे करेक्शन असून येत्या 3 ते 4 दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात निधी गुंतवणुकीची शक्यता असून रुपया स्थिर होईल.