आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruppe Fall Down; Reserve Bank Make Intervention In Ruppes Depreciation

रुपयाचा विक्रमी निचांक; डॉलरच्या तुलनेत 60 ची पातळी ओलांडण्याची भीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने गुरुवारी ऐतिहासिक निचांक नोंदवला. रुपयाने 130 पैसे गमावत 59.94 ची पातळी गाठली आहे.

विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली आहे. गेल्या आठवड्यापासून भारतीय रुपयाची घसरगुंडीची मालिका सुरुच आहे. भविष्यात असेच सुरु राहिल्यास एका डॉलरचे मुल्य 60 रुपयांपर्यंत पोहचू शकते.

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरतच आहे. गेल्या आठवड्यात 11 जून रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 58.98 इतकी होती. रूपयाच्या घसरणीचा परिणाम आयातीवर होणार असून खनिज तेल महागल्यास पेट्रोल व डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सेन्सेक्स 19 हजारांच्या खाली
रुपयाच्या घसरणीबरोबरच गुरुवारी शेअर बाजाराचा निर्देशांकाने गटांगळी खाल्ली. निर्देशांक 423 अंकांनी घसरुन 19 हजारांच्या खाली अर्थात 18,871.82 वर तर निफ्टी 121 अंकांनी घसरुन 5,701.25 वर पोहचला आहे.