आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपयाचा उच्‍चांक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



मुंबई - रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दरकपात केली. जागतिक बाजारात युरोच्या तुलनेत डॉलर घसरला. त्यामुळे रुपयाने बुधवारी डॉलरची यथेच्छ धुलाई करत साडेतीन महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 47 पैशांची कमाई करत 53.30 ही पातळी गाठली.

जागतिक स्तरावर डॉलरची घसरण आणि स्थानिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे विदेशी विनिमय बाजारात डॉलरची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने रुपयाला बळ मिळाल्याचे फॉरेक्स डीलर्सनी सांगितले.
सोने घसरले, चांदी वधारली : नफेखोरीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली. बुधवारी सोने तोळ्यामागे 190 रुपयांनी घटून 30,350 रुपयांवर आले. चांदीत मात्र किलोमागे 135 रुपयांची वाढ होऊन भाव 58,415 रुपयांवर पोहोचले.