आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • S Class Car Driving Experience Like Aeroplan By Marcedez

हवाई प्रवासाचा अनुभव देणारी मर्सिडीझची नवी एस- क्लास कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मर्सिडीझच्या नवीन एस-क्लास या मॉडेलमध्ये अधिक सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला आहे. एस-क्लासने जुनी डब्ल्यू 221 कार न हटवता त्यातील सुविधा वाढवल्या आहेत. डब्ल्यू 221 च्या समोर एक मोठे ग्रील असेल, ज्यावर क्रोम लावण्यात आले आहे. बंपरला वेगळा आकार देऊन बोनेटशी जोडले आहे. हेड लॅम्पला सॉफ्टर आणि ऑर्गेनिक असा लूक देण्यात आला आहे. प्रत्येक लँपमध्ये 56 एलईडी लावले आहेत. मागील भागातील लाइट्समध्येही हा प्रयोग करण्यात आला आहे. ब्रेकलाइट्समध्ये एलईडी लावण्यात आले आहे. जुन्या मॉडेलपेक्षा या कारचे वजन 20 किलोने कमी आहे. कारचे इंटेरियर विमानाच्या फर्स्टक्लास केबिनप्रमाणे आहे. मागील दरवाजे थोडे मोठे आहेत.


कारच्या आत 12.3 इंचांचे दोन टीएफटी स्क्रीन असून यातील डॅशबोर्डवर डिस्प्ले डिजिटल आहे. यात जुन्या स्पीडोमीटरपासून टेकोमीटर डायल्सदेखील आहेत. बाजूलाच मल्टिमीडियासाठी कंट्रोल स्क्रीन बसवण्यात आली आहे. कार फ्रेश ठेवण्यासाठी थर्मोट्रॉनिक सिस्टिम आहे. कारच्या मागील सीटसाठी पाच पर्याय असून त्यात 45 अंशांच्या कोनात मागे जाणारे बॅकरेस्ट आहे. हिल रेस्ट आणि काफ सपोर्टसुद्धा आहे. अपघाताच्या वेळी प्रवासी पुढे ढकलला जाऊ नये याकरिता सीटच्या कुशनवरच एअरबॅग बसवण्यात आली आहे.


किंमत: 91 लाखांपासून/ 2014 मध्‍ये बाजारात


टेक स्पेक मर्सिडीझ एस- क्लास
इंजिन - 2987 सीसी (डिझेल), 3498 सीसी आणि 5461 (पेट्रोल)


स्टे‍अरिंग
पॉवर स्टे‍अरिंग 5- सीटर कार


गिअरबॉक्स
7- स्पीड, ऑटोमॅटिक, आरडब्ल्यूडी


आसन व्यवस्था
मागील सीटसाठी पाच पर्याय उपलब्‍ध आहेत.आसन व्यवस्था मागील सीटसाठी पाच पर्याय उपलब्ध आहेत.