आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ‘सोन्यातील गुंतवणुकीला आपल्या देशात विशेष महत्त्व आहे. कारण जेव्हा तुम्ही सोन्याचे नाणे खरेदी करता त्या वेळी ती तुमच्यासाठी खास स्मृतिदायक गोष्ट आणि ती तुमच्यासाठी एक अनमोल ठेवा बनते. त्यामुळे मलाही सोने खरेदी करायला आवडते; परंतु आताच्या दिवसांत माझी पत्नी अंजलीच खरेदीचे सर्व बघते आणि महिलांना खरेदीपासून दूर ठेवणे साहजिकच कोणालाही शक्य नाही’, हे उद्गार आहेत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे. क्रिकेटच्या मैदानावर गाजवलेल्या विक्रमाच्या ऐतिहासिक क्षणांच्या निमित्ताने सचिनला सोन्याच्या भेटवस्तू, स्मृतिचिन्ह मिळाले असेल; पण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणार्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपलीच प्रतिमा असलेले सोन्याचे नाणे अनावरण करण्यासारखा सुवर्णक्षण दुसरा कोणताही नाही, असेही त्याने मनोमन सांगितले.
मैदानावरचे अनेक सुवर्णक्षण माझ्याकडे मी जपून ठेवले आहेत. काही सुंदर आठवणीही आहेत; परंतु हा सुवर्णक्षण खरोखरच वेगळा आहे, असे सचिन म्हणाला. निमित्त होते अक्षय्य तृतीयेनिमित्त व्हॅल्यू मार्ट गोल्ड अँड ज्वेलर्सने सचिनच्या अतुलनीय क्रिकेट पराक्रमाचा सन्मान म्हणून खास त्याचे चित्र आणि स्वाक्षरी असलेली एक लाख सोन्याची नाणी बाजारात विक्रीला आणली आहेत. या सोन्याच्या नाण्याच्या अनावरणप्रसंगी आयोजित केलेल्या एका खास समारंभात त्याने सोन्याबद्दल खूप काही सांगितले. व्हॅल्यू मार्टने सचिन तेंडुलकरला तीन वर्षे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले आहे.
सोन्याची खरेदी करणे मला आवडते. विशेष करून गळ्यात सुंदर सोन्याची साखळी आवडत असल्याने ती मी माझ्या लहानपणीच घातली, असे सांगून सचिन पुढे म्हणाला की, क्रिकेटपटंूनादेखील सोने आवडते. वेस्ट इंडीजच्या संघाला जाऊन विचारा, त्यांनाही सोन्याचे वेड आहे. सोन्याची साखळी आणि त्यात एक सुंदर पदक सगळ्यांना आवडते.
व्हॅल्यू मार्ट रिटेल लि.ची उपकंपनी असलेल्या व्हॅल्यू मार्ट गोल्ड अँड ज्वेल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. वासुदेवन म्हणाले की, सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेटमधील सुवर्णयुगाचा आनंद आपण खर्या अर्थाने अनुभवला. सचिनने आपल्या चाहत्यांना दिलेले अनेक भेटरूपी सुवर्णक्षण आता व्हॅल्यू मार्ट या सोन्याच्या नाण्यांच्या माध्यमातून साजरा करीत आहे.
सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून ‘गोल्डन ड्रीम्स’ नावाची एक नवीन संस्था स्थापन करण्यात आली असून ही संस्था देशातल्या गरीब मुलांसाठी काम करणार आहे. या सोन्याच्या नाणे विक्रीतून मिळालेली काही रक्कम या कार्यासाठी संस्थेला देण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
खणखणीत नाणे
विक्रीसाठी 1,00,000 नाणी.
प्रत्येकी किंमत 34,000 रु.
‘व्हॅल्यू मार्ट गोल्ड.कॉम’वर ऑनलाइन खरेदी.
24 कॅरेट नाणे 10 ग्रॅमचे.
सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी स्विसमधील ‘मे. व्हल्काम्बी एस ए’ टांकसाळीमध्ये उत्पादन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.