आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin's Brand Value As It, 16 Big Companies Brandambassedor

सचिनची ‘ब्रँड व्हॅल्यू’ राहणार जशास तशी, 16 बड्या कंपन्यांचा ‘ब्रँडदूत’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्यक्ती एखाद्या पदावर वा प्रसिद्धीच्या शिखरावर असते तोपर्यंतच त्यांच्यासमोर मानपानाचे ताट सारखे समोर येत असते; पण निवृत्ती सोहळ्याचा भव्यदिव्य मानपान वगळता हळूहळू त्याची किंमत शून्य होऊ लागते. आपल्या ब्रँडची ‘दीवार’ उतारवयातही अभेद्य ठेवण्यात अमिताभ हा ‘बॉलीवूड’मधील एक अपवाद मानला जातो. तसाच अपवाद ‘क्रिकेटवूड’मध्ये ठरणार आहे तो सचिन तेंडुलकर या रूपाने. मास्टरब्लास्टरच्या बॅटीतून होणा-या धावांच्या वर्षावात यापुढे चिंब भिजायला मिळणार नसले तरी त्याच्या जाहिरातींची बरसात मात्र यापुढेही होत राहणार आहे.
क्रिकेटसम्राट सचिन सध्या जवळपास 16 बड्या कंपन्यांच्या उत्पादनांचा ‘ब्रँडदूत’ आहे. या सोळा प्रायोजकांसाठीच आपल्या निवृत्तीचा निर्णय तो गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर टाकत असल्याची टीकाही मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये झाली होती; पण आता निवृत्ती जाहीर केल्यानंतरही बहुतांश प्रायोजक कंपन्यांनी यापुढेही त्याला साथ देण्याचे ठरवले आहे.
विविध सामाजिक उपक्रमांसाठी गेल्या सहा वर्षांपासून सचिन तेंडुलकर अविवा लाइफ इन्शुरन्ससाठी ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत आहे. सचिनच्या निवृत्तीबद्दल ‘दिव्य मराठी’शी बोलताना कंपनीच्या बँकॅशुरन्स आणि विपणन विभागाचे संचालक रिशी पिपारैया म्हणाले की, केवळ क्रिकेटर म्हणून नाही, तर एक वडील, मुलगा आणि भारतीय दृष्टिकोनातून अविवा सचिनकडे बघते. त्यामुळे भविष्यातही ब्रँडदूत म्हणून असलेले आमचे सहकार्य यापुढेही कायम राहील.
‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाने आयोजित केलेल्या ‘सलाम सचिन’ या खास कार्यक्रमातही हाच सूर आळवण्यात आला. तेंडुलकरने क्रिकेट सोडल्यानंतर आपल्या ब्रँडचे काय होणार याची चिंता करण्यापेक्षा सचिन ब्रँड अजूनही जबरदस्तच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करतानाच सचिन हे नाव अजून काही वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लोकांच्या चांगलेच स्मरणात राहील. निवृत्त झाला म्हणून त्याचे मूल्य कमी होत नाही याबाबत प्रत्येकाने एकमत व्यक्त केले.स्वप्ने कशी बघावीत आणि ती कशी साकारावीत हे भारतीयांना शिकवणारा सचिन खरोखरच एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे असूनही तो आजही तितकाच विनम्र आहे. तो निवृत्त होत असला तरी संधी संपलेल्या नाही.
सचिनकडे असलेले सध्याचे ब्रँड
पेप्सी : 1992 (विद्यमान), एसपीएन स्टार स्पोटर्स : 2002 ते आतापर्यंत, रेनॉल्ड : 2007 (विद्यमान), बूस्ट : 1990 पासून आतापर्यंत, सॅन्यो बीपीएल : 2007 पासून आतापर्यंत, तोशिबा : 2010 पासून आतापर्यंत, ल्युमिनस इंडिया : 2010 पासून आतापर्यंत, बीपीएल : 2007 पासून.
सचिनकडे असलेले सध्याचे ब्रँड
पेप्सी : 1992 (विद्यमान), एसपीएन स्टार स्पोटर््स : 2002 ते आतापर्यंत, रेनॉल्ड : 2007 (विद्यमान), बूस्ट : 1990 पासून आतापर्यंत, सॅन्यो बीपीएल : 2007 पासून आतापर्यंत, तोशिबा : 2010 पासून आतापर्यंत, ल्युमिनस इंडिया : 2010 पासून आतापर्यंत, बीपीएल : 2007 पासून.