आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahara Subrato Roy News In Marathi, Supreme Court

तिहार तुरुंगातून सुब्रतो रॉय यांना सोडण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना तिहार तुरुंगातून सोडावे अशी या समुहाने केलेली विनंती आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सुब्रतो रॉय यांच्या सुटकेशिवाय पैसे उभे करता येणार नाहीत. आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहाराची संपत्ती विकत घेणार नाही, असे या समुहाने न्यायालयात सांगितले होते.
तिहार तुरुंगातून सुटका करून सुब्रतो रॉय यांना घरी नजरकैदेत ठेवावे, असा प्रस्तावही सहारा समुहाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. सुब्रतो तुरुंगात असल्याने त्यांच्या सुटकेसाठी पैसा उभा करण्यात मोठे अडथळे येत असल्याचे समुहाकडून सांगण्यात आले होते.
यासंदर्भात सहारा समुहाचे वकील राम जेठमलानी म्हणाले, की पैसे उभे करण्यासाठी सहारा समुहाला काही संपत्ती विकावी लागेल. यासाठी आंतरराष्ट्रीय खरेदीदार शोधण्यात येत आहेत. परंतु, ते तिहार तुरुंगात भेटायला येऊ शकत नाहीत. त्यामुळे सुब्रतो रॉय यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची गरज आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले असल्याने तिहार तुरुंगातील परिस्थिती अतिशय खराब आहे. अशा परिस्थितीत संपत्तीच्या विक्रीवर चर्चा होऊ शकत नाही. जर सुब्रतो तुरुंगात राहिले तर हे पैसे उभे करता येणार नाहीत.
सुब्रतो रॉय यांना घालून दिलेल्या अटींवरच सोडले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सुब्रतो रॉय आणि दोन संचालकांच्या सुटकेसाठी 2,500 कोटी रुपये तत्काळ आणि 2,500 कोटी रुपये तीन आठवड्यांत देण्याचा सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आलेला प्रस्तावही सहारा समुहाने मागे घेतला आहे.
सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी 10,000 कोटी रुपये भरण्याचा आदेश गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे रॉय तिहार तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत आहेत.