आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही बँकेत जमा होणार पगार; खाते बदलण्याची गरज नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- वारंवार नोकर्‍या बदलणार्‍या खासगी कंपन्यातील कर्मचार्‍यांची नवे बँक खाते उघडण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. म्हणजे तुमचे खाते कोणत्याही बँकेत असो वेतन त्या खात्यात जमा होणार आहे. कर्जाचा हप्ताही त्याच खात्यातून वळता केला जाण्याची सुविधा या सेवेद्वारे मिळणार आहे. कंपनीचा ज्या बँकेशी करार आहे त्याच बँकेत खाते उघडण्याची आता आवश्यकता राहणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या ईसीएस सेवेमुळे हे शक्य होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीत गुजरातेत इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) सुरू केली आहे. याशिवाय कर्जापोटी घेण्यात येणार्‍या आगाऊ तारखेच्या धनादेशावर (पोस्ट डेटेड चेक) रिझर्व्ह बँकेने बंदी आणली आहे. यामुळे बँका तसेच बँकेतर वित्तीय संस्थांना आता ग्राहकांकडून पोस्ट डेटेड चेक घेता येणार नाहीत. कर्जाचा हप्ता ईसीएसद्वारेच भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी या पूर्वीच अशा प्रकारचे चेक दिले असतील त्यांना हे धनादेश परत देण्याचे सांगण्यात आले असून ईसीएस प्रणालीची माहिती त्यांना द्यावी असे रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांना निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने या सेवेची सुरुवात 2008 मध्येच केली होती. ही सेवा गुजरातेतील अहमदाबाद, बडोदरा, सुरत आणि राजकोट आदी शहरांत सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून पूर्ण गुजरातेत ईसीएस सेवा सुरू करण्यात आली आहे.

नेमके काय होणार
० आता त्या कर्मचार्‍याने समजा कंपनी बदलली तरी त्या कर्मचार्‍याचे खाते कोणत्याही बँकेत असले तरी त्या खात्यात त्याचे वेतन जमा होईल. अट एवढीच की ती बँक कोअर बँकिंग प्रणालीशी जोडलेली असावी.
० सध्या ज्या बँकेशी कंपनीचा करार आहे, त्याच बँकेत कर्मचार्‍याला खाते उघडावे लागते.

लवकरच देशभरात लागू होणार
गुजरातनंतर देशातील अन्य राज्यांतही ही सेवा सुरू होणार आहे. मात्र प्रत्येक राज्यासाठी ही सेवा बंधनकारक नाही. याचाच अर्थ असा की, बँक कोणत्याही कंपनीला बंधन घालू शकणार नाही. कंपनीला आपल्या सोयीनुसार या सेवेचा वापर करण्याची मुभा आहे.