आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप अधिकार्‍यांना यंदा 10 % पगारवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक वाढीला मिळू लागलेली संजीवनी आणि व्यवसायाच्या वाढत्या संधी यामुळे यंदाच्या वर्षात कंपन्या आपल्या अव्वल अधिकार्‍यांना दहा टक्क्यांपेक्षा जास्त पगारवाढ देतील, असा अंदाज एका अभ्यासात व्यक्त केला आहे.

‘हे ग्रुप’ या जागतिक व्यवस्थापन आणि सल्ला सेवा कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक स्तरावरील अधिकार्‍यांना यंदा दहा टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षात नऊ टक्के पगारवाढ देण्यात आली होती. वरिष्ठ व्यवस्थापन चमूचा एक भाग असलेल्या अव्वल अधिकार्‍यांना मागील वर्षातल्या 9.5 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 10.4 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षानंतर यंदा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्यावरील अव्वल चमूच्या पगारात दोनअंकी वाढ अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आर्थिक वाढीला पुनरुज्जीवन मिळणार असल्याने पगारवाढीच्या संधी वाढल्या असल्याचे व पगाराचे प्रमाण बहुराष्ट्रीय आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात जास्त असल्याचे हे ग्रुप इंडियाचे भारतातील प्रमुख श्रीधर गणेशन यांनी सांगितले.

निवडणुकांनंतर सकारात्मक चित्र
सध्या आर्थिक मरगळ असली तरी निवडणुका झाल्यानंतर व्यवसाय क्षेत्राचे चित्र सकारात्मक होण्याचा अंदाज कंपन्यांनी व्यक्त केला असल्याचे गणेशन म्हणाले. देशातल्या सीईओंना प्रवेश पातळीवरील व्यावसायिकांच्या तुलनेत 78 पट पगार मिळत असून हे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे हे ग्रुपने म्हटले आहे.