आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - पगारदारांच्या कर बचतीत एचआरए (हाउसिंग रेंट अलाउन्स) महत्त्वाचा घटक आहे. वार्षिक दहा लाखांहून अधिक वेतन असणारे व महागाई भत्त्यासह ज्यांचे मूळ वेतन 50 हजार रुपये आहे, असे पगारदार एचआरएद्वारे वर्षाकाठी 1.80 लाख रुपयांची बचत करू शकतात. प्राप्तिकर बचतीत एचआरएची गणना करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे.
दिल्लीतील जे. एस. फायनान्शियल अॅडव्हायझर्सचे सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर जितेंद्र सोळंकी यांच्या मते, नियोक्त्यांकडून मिळणारा एचआरए, महानगरांत मूळ वेतनाच्या 50 टक्के, इतर शहरांत मूळ वेतनाच्या 40 टक्के आणि वास्तविक भाड्यापोटी कपात करण्यात आलेल्या मूळ वेतनाच्या 10 टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेवर कर लागू होत नाही. अशा पद्धतीने महानगरांत वार्षिक पाच लाखांपेक्षा कमी वेतन मिळवणारे, महागाई भत्त्यासह मूळ वेतन 25,000 रुपये आहे असे पगारदार एचआरएद्वारे वर्षाकाठी 1.02 लाख रुपयांची कर बचत करू शकतात.
जे पगारदार भाड्याने राहतात आणि महिन्याला 3000 रुपये भाडे देतात, अशांना केवळ भाडे पावती देण्याची आवश्यकता आहे. याउलट जे कर्मचारी महिन्याला 3000 रुपयांपेक्षा अधिक भाडे देतात, अशांना भाडे पावतीसह भाडे करार (रेंट अग्रीमेंट) संस्थेच्या एचआर विभागात सादर करावा लागतो. अशा प्रकारे एचआरएद्वारे कर बचतीचा लाभ मिळवता येतो.
कर्मचा-याने होमलोनद्वारे घर खरेदी केले असेल आणि तो किरायाने दुस-या घरात राहत असेल तर त्यालाही एचआरएचा लाभ उठवता येतो. एवढेच नव्हे तर एचआरएबरोबरच त्या कर्मचा-याला होमलोनच्या मूळ रक्कम आणि व्याजापोटी प्राप्तिकरात मिळणा-या सवलतीचाही लाभ मिळवता येतो. होमलोनच्या परतफेडीसाठी प्राप्तिकर कायद्याच्या 80 सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो आणि यासाठी मूळ रकमेची मर्यादा जास्तीत जास्त 1 लाख रुपये आहे. होमलोनवरील व्याजापोटी कलम 24 बी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो आणि याची कमाल मर्यादा एका घरासाठी दीड लाख रुपये आहे.
अशी होते एचआरएद्वारे कर बचत
एकूण वेतन वार्षिक पाच लाख रुपयांहून कमी
महागाई भत्त्यासह मूळ वेतन 25,000 रुपये प्रतिमाह
भाडे 11000 रुपये प्रतिमाह
नियोक्त्याकडून मिळणारा एचआरए 12000 रुपये प्रतिमाह
एचआरएवर मिळणारी सूट : खालीलपैकी जी रक्कम कमी असेल त्यावर मिळणारी सवलत
1) नियोक्त्याकडून मिळणारा एचआरए : 12,000 रुपये
2) वेतनाच्या 10 टक्क्यांहून अधिक देण्यात आलेले भाडे : 8,500 रुपये
3) वेतनाच्या 40 टक्के किंवा 50 टक्के : 12,500 रुपये
प्रतिमाह एचआरएद्वारे मिळणारी सूट : 8,500 रुपये
एचआरएद्वारे वर्षाकाठी मिळणारी सूट : 1,02,000 रुपये
एकूण वेतन वार्षिक 10 लाख रुपयांहून अधिक
महागाई भत्त्यासह मूळ वेतन 50,000 रुपये प्रतिमाह
भाडे 20,000 रुपये प्रतिमाह
नियोक्त्याकडून मिळणारा एचआरए 17,000 रुपये प्रतिमाह
एचआरएवर मिळणारी सूट : खालीलपैकी जी रक्कम कमी असेल त्यावर मिळणारी सवलत
1) नियोक्त्याकडून मिळणारा एचआरए : 17,000 रुपये
2) वेतनाच्या 10 टक्क्यांहून अधिक देण्यात आलेले भाडे : 15,000 रुपये
3) वेतनाच्या 40 टक्के किंवा 50 टक्के : 25,000 रुपये
प्रतिमाह एचआरएद्वारे मिळणारी सूट : 15,000 रुपये
एचआरएद्वारे वर्षाकाठी मिळणारी सूट : 1,80,000 रुपये
राज्य सरकारकडे कर परताव्यापोटी सात हजार कोटींचे दावे
खिशाला लागणार कात्री; एकाच सेवेसाठी द्यावा लागणार वेगवेगळा कर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.