आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगचा 55 इंची कर्व्हड ओएलईडी 7.8 लाखांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा 55 इंची कर्व्हड ओएलईडी बाजारात दाखल झाला आहे. सध्या कोरियात उपलब्ध असलेल्या या टीव्हीची किंमत 13 हजार डॉलर (सुमारे 7.8 लाख रुपये) राहील. काही महिन्यांपूर्वी बाजारात आलेल्या गॅलक्सी एस-4 प्रमाणेच या टीव्हीलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची सॅमसंगला अपेक्षा आहे.
खास ग्राहक वर्गावर नजर
उच्च गुणवत्तेच्या टीव्हीसाठी भरपूर पैसे खर्च करण्याची तयारी असणा-या ग्राहकांसाठी कंपनीने हा नव्या पिढीचा टीव्ही तयार केला आहे.

प्रत्येक कोनातून वेगळा दृश्य परिणाम
ओएलईडी तंत्रामुळे प्रेक्षक आणि टीव्ही स्क्रीन यांच्या प्रत्येक बाजूने एकसारखे अंतर राहते. त्रिमितीय (थ्रीडी)कॅपेबिलिटी आणि कर्व्हड ओएलईडी, थ्रीडी ग्लास यात आहे. त्याबरोबर एक बिल्ट इन इअर फोन यात आहे.