आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगच्या शिरपेचात विश्वासार्ह ब्रँडचा तुरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्मितीत आघाडीवर असलेला दक्षिण कोरियातील सॅमसंग हा देशातील सर्वात विश्वसनीय ब्रॅँड ठरला असून त्यापाठोपाठ सोनी आणि टाटा या ब्रॅँडने क्रमांक लावला आहे. गेल्या वर्षात हे तीन ब्रॅँड अनुक्रमे दुस-या, तिस-या आणि पाचव्या क्रमांकावर असल्याचे ‘ब्रॅँड ट्रस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरीकडून गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी अव्वल 100 कंपन्यांचे सर्वेक्षण करून ब्रँड ट्रस्ट अहवाल प्रसिद्ध केला जातो. अन्य कंपन्यांमध्ये दक्षिण कोरियातीलच एलजी हा ब्रॅँड चौथ्या स्थानावर असून नोकिया ब्रॅँडला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.


अमेरिकेतील हॅवलेट पॅकार्ड यंदाच्या वर्षात 14 स्थाने वर गेली असून हा सहावा सर्वात विश्वासार्ह ब्रॅँड ठरला आहे. हीरो कंपनीनेदेखील 79 व्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर उडी घेतली आहे. अव्वल दहा ब्रॅँड्समध्ये होंडा, रिलायन्स, महिंद्रा या कंपन्या आहेत.