नोकियाला पछाडून सॅमसंग / नोकियाला पछाडून सॅमसंग बनली नं. 1 मोबाईल विक्रेती कंपनी

वृत्तसंस्था

Apr 28,2012 01:58:22 PM IST

मोबाईल हॅण्‍डसेट निर्मितीच्‍या क्षेत्रात नोकियाची मक्तेदारी संपुष्‍टात आली आहे. नोकियाला पछाडून सॅमसंग जगातील नंबर एकची कंपनी बनली आहे. आतापर्यंत मोबाईल विक्रीमध्‍ये नोकिया अग्रस्‍थानी होती.
चालु आर्थिक वर्षातील पहिल्‍या तिमाहीमध्‍ये सॅमसंगने 9.35 कोटी हॅण्‍डसेटची विक्री केली आहे. तर नोकियाच्‍या विक्रीमध्‍ये 24 टक्‍के धट नोंदविण्‍यात आली आहे. हॅण्‍डसेटच्‍या बाजारपेठेत सँगसंगचा वाटा आता 25 टक्‍के झाला आहे. तर नोकियाचा वाटा घटून 22.5 टक्‍के झाला आहे. गेल्‍यावर्षी नोकियाचा वाटा 30 टक्‍के होता. तर सॅमसंगचा वाटा 20 टक्‍के होता. वर्षभरातच सॅमसंगने झेप घेतली आहे. या वर्षात सॅमसंगने अनेक आकर्षक तसेच नविन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे हॅण्‍डसेट सादर केले. गॅलक्‍सी मालिकेतील हॅण्‍डसेट अल्‍पाधीतच लोकप्रिय झाले. अगदी 5 हजारापासून 35 हजारांपर्यंत किंमती असलेले हॅण्‍डसेट या श्रेणीत आहेत.

X
COMMENT