आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Company Take Lead In Indian Mobile Market

भारतीय मोबाइल बाजारपेठेत सॅमसंग कंपनीची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोरियन हँडसेट कंपनी सॅमसंगने भारतीय मोबाइल बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. मात्र, या कंपनीला मायक्रोमॅक्स, कार्बन, लावा आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे तेवढेच तुल्यबळ आव्हान मिळत आहे.

सायबर मीडिया रिसर्चच्या(सीएमआर) अहवालानुसार, डिसेंबर २०१४ अखेरीस सॅमसंगचा बाजारपेठेतील वाटा १६.५ टक्क्यांनी घसरला आहे. त्या वर्षाच्या सुरुवातीस तो २०.३ टक्के होता. इंडिया मंथली मोबाइल हँडसेट रिव्ह्यू २०१४ च्या अहवालानुसार भारतीय मोबाइल हँडसेट बाजारपेठेत ४ टक्क्यांनी वाढ होत २५७ दशलक्ष युनिटसची विक्री झाली आहे. यामध्ये सॅमसंग १६.५ टक्के, मायक्रोमॅक्स आणि मायक्रोसॉफ्ट (नोकिया) यांचा वाटा १३.३ टक्के राहिला आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात बाजारपेठेत सॅमसंगची पकड निसटत असल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये एप्रिल-जून महिन्यातील आकडेवारीत मायक्रोमॅक्सच्या तुलनेत सॅमसंगच्या उत्पादनाची घसरण झाली. त्यानंतर वर्षअखेरच्या महिन्यांत सॅमसंगने आपले स्थान कायम ठेवले. जानेवारी-मार्च २०१४ मध्ये सॅमसंगचा बाजारपेठेतील वाटा २०.३ टक्के होता, त्याच वेळी मायक्रोमॅक्स ११.२ आणि मायक्रोसॉफ्टचा वाटा १७.६ टक्के होता.

२०१४ मध्ये देशात ७ कोटी ७० लाख स्मार्टफोन युनिटची आयात करण्यात आली. मोबाइल हँडसेट बाजारपेठेतील हा वाटा ३० टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत स्मार्टफोन क्षेत्रातील बाजारात ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सॅमसंग कंपनीची या विभागातही ४३.२ टक्क्यांवरून २९.३ टक्क्यांवर घसरण झाली आहे. जानेवारी-मार्च २०१४ मध्ये मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १७.५ टक्क्यांवरून १८.९ टक्क्यांवर गेल्याचे सांगण्यात येते.