आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX- सॅमसंगचा मॅटॅलिक बॉडी असलेला Galaxy Note 4 आणि कर्व्ह स्क्रीनचा Galaxy Note Edge लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Samsung galaxy note 4)
गॅजेट डेस्क - सॅमसंगने त्यांच्या बहूप्रतिक्षित हाय बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 4 आज लॉन्च केला आहे. हा इव्हेंट बीजिंग, न्यूयॉर्क आणि बर्लिन या तिन्ही ठीकाणी एकाच वेळेच पार पडला. यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओ कंपनीने ब्रॉडकास्ट केले होते. बर्लिन मध्ये होणर्‍या प्री-IFA इव्हेंट दरम्यान हा फोन लॉन्च करण्यात आला. नेहमीप्रमाणे सॅमसंगच्या अनपॅक्ड इव्हेंट होस्ट केला आहे. या इव्हेंटमध्ये डेव्हीड पार्क (वरिष्ठ व्यवस्थापक), रॉयल ओ नील, डी जे ली (सॅमसंगचे सेल्स आणि मार्केटींगचे हेड) हे सुध्दा उपस्थित होते.
या इव्हेंटचे वैशिष्ट्य
1. सॅमसंगने या इव्हेंटमध्ये आलेल्यांचे ऑर्केस्ट्राने स्वागत केले. या गीत-संगीताच्या कार्यक्रमात वाजवण्यात आलेले संपूर्ण संगीत गॅलेक्सी नोट 4 च्या साह्याने वाजवण्यात आले.
2. डी जे ली (सॅमसंगचे सेल्स आणि मार्केटींगचे हेड) यांनी सॅमसंगच्या लोकप्रिय गॅलक्सी सिरिजबद्दल भाषण केले.

3. भाषणानंतर डी. जे. ली. यांनी गॅलक्सी नोट 4 लॉन्च केला.
4. हा फोन 4 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला. तसेच या फोनच्या 3 वैशिष्ट्यांबद्दल सांगण्यात आले.
- अत्याधुनिक तंत्रज्ञान
- नवे डिझाईन
- उत्कृष्ट असा S पेनचा अनुभव
5. त्यानंतर कर्व्ह सिरिजमधील गॅलक्सी नोट एज लॉन्च करण्यात आला. फोन एज गोलाकार स्क्रीनसमवेत लॉन्च करण्यात आला. या फोनची कर्व्ह स्क्रीन आणि मेन स्क्रीन वेगवेगळे काम करतात.
6. त्यानंतर सॅमसंग गिअर S स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आली. यासोबतच सॅमसंग गिअर VR सुध्दा लॉन्च करण्यात आले. गॅलक्सी VR ला गॅलक्सी नोट 4 सोबत वापरता येते. यामुळे चांगला व्ह्यूईंग एक्सपेरियन्स मिळतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या स्मार्टफोनचे फीचर्स आणि इव्हेंटचे फोटो -