आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samsung\'s First Metallic Smartphone Galaxy Alpha Price Slashed To 13000 Rs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Samsung Galaxy Alpha झाला स्वस्त, 13 हजार रुपयांपर्यंत मिळतोय डिस्काऊंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung कंपनीचा पहिला मेटॅलिक स्मार्टफोन Galaxy alpha स्वस्त झाला आहे. भारतीय बाजारात सप्टेंबर 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता. तेव्हा या फोनची किंमत 39,990 रुपये होते. आता मात्र, हा फोन 26,990 रुपयांत उपलब्ध झाला आहे. या फोनवर जवळपास 13 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट 'स्नॅपडील'ने Samsung Galaxy Alpha वर डिस्काऊंट दिला आहे. मात्र, Samsung ई-स्टोअरवर या फोनची किंमत 38,900 रुपये आहे तर 'फ्लिपकार्ट'वर हा फोन 31,800 रुपयांत विकला जात आहे. याचा अर्थ असा की, Samsung कंपनीने Galaxy Alpha ची किंमत कमी झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, Samsung Galaxy Alpha ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे या फोनचे प्रॉडक्शन 2015च्या दुसर्‍या तिमाहीतच बंद करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. स्टॉकमधील फोन विक्री करण्यासाठी Galaxy Alpha च्या किंमतीत कपात केल्याची चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, Galaxy Alaphaचे फीचर्स...