आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG ने लॉन्च केला GALAXY GRAND 2, जाणून घ्या फीचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SAMSUNG ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन GALAXY GRAND 2 सादर केला आहे. बॉलिवूड अभ‍िनेत्री हुमा कुरेशी हिच्या हस्ते मुंबईत एका इव्हेंटमध्ये सोमवारी हा स्मार्टफोन लॉन्च करण्‍यात आला. SAMSUNG ची GALAXY सि‍रिज भारतात खूप लोकप्रिय ठरली आहे.
SAMSUNG GALAXY GRAND 2 हा फोन अनेक अद्ययावत फीचर्सने परिपूर्ण आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने GALAXY GRAND 3 सारखे लेदर कव्हरही दिले आहे. त्यामुळे या फोनचा लूक खूपच आकर्षित झाला आहे. तसेच रॅमसोबत बॅटरी पॉवरही वाढवली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
GALAXY GRAND 2 च्या किमतीबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. परंतु, या फोनची किमत 22900 ते 24900 रुपये असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, SAMSUNG GALAXY GRAND 2 ची वैशिष्ट्ये...