आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung गॅलक्सीच्या नव्या फॅब्लेटची ‘ग्रँड’ धमाल, जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गॅलक्सी ड्युओज 2’ बाजारात येऊन पंधरा दिवस होत नाहीत तोच सॅमसंगने आता ‘गॅलक्सी ग्रँड 2 फॅब्लेट’चा नवा नजराणा मोबाइलप्रेमींसाठी उपलब्ध करून दिला आहे. वर्षाच्या प्रारंभीच सॅमसंगने आणलेल्या पहिल्या गॅलक्सी ग्रँडला लक्षणीय प्रतिसाद मिळाला होता. परंतु आता ग्रँड 2 ची ही नवीन आवृत्ती असून मोठी स्क्रीन, रॅमची जास्त क्षमता आणि अगोदरच्या तुलनेत मोठी बॅटरी हे ग्राहकांसाठी नवीन आकर्षण ठरणार आहे.
गॅलक्स ग्रँड 2 मध्ये व्हिव्हिड एचडी स्क्रीन असल्यामुळे दृश्यतेचा एक अनोखा अनुभव तसेत मल्टिविंडोसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु त्याचबरोबर क्लब सॅमसंग पहिल्यांदाच सुरू केल्यामुळे ग्राहकांना कंटेंट आणि सेवा याचा वेगळा लाभ मिळू शकेल, असे सॅमसंग इंडियाच्या माहिती तंत्रज्ञान आणि मोबाइल विभागाचे प्रमुख विनीत तनेजा यांनी सांगितले.
तांत्रिक वैशिष्ट्ये
० अँड्रॉइड 4.3 जेलीबिन, क्वॅड कोअर 1.2 जीएचझेड प्रोसेसर, 1.5 जीबी रॅम, 2600 एमएच बॅटरी, 1.9 मेगापिक्सेल पुढचा कॅमेरा, वजन : 163 ग्रॅम
० खास डिजिटल एंटरटेनमेंट स्टोअर
० डिजिटल एंटरटेनमेंट स्टोअर सॅमसंगने पहिल्यांदाच सुरू केले असून त्यात भारतीय संगीत, चित्रपट, लाइव्ह टीव्ही आणि गिग्ज हे सॅमसंग क्लबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. एकाच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध असून त्यात विविध भाषांतील पाच हजार चित्रपट, चार लाख गाणी आणि 500 गिग्ज तसेच 90 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्हीची मजा
० तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड कंटेंट करा चकटफू डाऊनलोड
० या तीन रंगांत : काळा, पांढरा, गुलाबी
० बाजारात कधी : जानेवारी 2014
असा आहे नवीन गॅलक्सी ग्रँड 2
० 13.3 सें.मी. एचडी स्क्रीनमुळे चित्रपट पाहणे, खेळ, पूस्तक वाचणे आणखी सोयीचे
० टॉगल पद्धतीमुळे एक विंडो बंद न करता किंवा नवीन पेज ओपन करणे सुलभ
० एकाच वेळी दोन अ‍ॅप्लिकेशन्स दोन विंडोजमध्ये उघडता येतात.
० जास्त सडपातळ आणि वजनाने हलका - 8.9 मि.मी.
० दहा तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक व 17 तास कॉल्स करणे शक्य
० प्रीलोडेड सॅमसंग अ‍ॅप्समुळे
किंमत
22,990 रु. ते 24,990 रु. दरम्यान
छायाचित्र - सॅमसंगच्या ग्रँड स्मार्टफोनचे सादरीकरण सोमवारी मुंबईत झाले. त्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी, सॅमसंगचे कंट्री हेड (मोबाइल अँड आयटी) विनीत तनेजा (डावीकडे) व सॅमसंग इंडियाचे संचालक मनू शर्मा.