आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सॅमसंगचा सुपर साइज गॅलेक्सी नोट लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - मोबाइल उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंगने मंगळवारी येथे सुपर साइज गॅलेक्सी नोट लाँच केला. आयपॅड, स्मार्टफोनच्या अब्जावधींच्या मार्केटवर ताबा मिळवण्यासाठी सॅमसंग व अ‍ॅपलमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, त्यात आघाडी घेण्यासाठी म्हणून सॅमसंगने हा सुपर गॅलेक्सी नोट बाजारात आणले आहे.
जर्मनी व संयुक्त अरब अमिरातीमध्ये गॅलेक्सी नोट 10.1 मंगळवारपासून विक्रीस उपलब्ध झाल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. 15 ऑगस्टपासून अमेरिका व त्यानंतर पुढच्या आठवड्यात तो ब्रिटनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भारतात तो ऑगस्ट अखेरीस उपलब्ध होईल. हा नोट वजनाने हलका आणि आकर्षक असून त्याचा प्रोसेसरही वेगवान आहे. अ‍ॅन्ड्रॉइड सुविधा, सपोर्ट सिस्टम व इतर वैशिष्ट्यांमुळे टॅबलेट कॉम्प्युटर मार्केटच्या क्षेत्रात अ‍ॅपलच्या आयपॅडला मात देण्यासाठी याचा उपयोग होईल, असा कंपनीचा दावा आहे.
गॅलेक्सी नोटची वैशिष्ट्ये
* अँड्रॉइड 4.0
* 25.6 सेंटिमीटर स्क्रीन : टचस्क्रीन फीचर्स (पहिल्या नोटपॅडपेक्षा नव्या व्हर्जनमध्ये रूंदी वाढली)
* 1.4 गीगाहर्ट्झ ड्यूल कोअर प्रोसेसर
* वाय -फाय, 7000 एमएएच बॅटरी
* सफाईदारपणे लिहिण्यासाठी एस पेन
* स्क्रीन अर्धी करुन इतर प्रोग्राम बघण्याची सोय
* अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आधीच्या व्हर्जनपेक्षा अनेक वेगवान अ‍ॅप्लेकशन
* सुपर साइज गॅलेक्सी नोट लाँचभारतात 29 ऑगस्टला उपलब्ध होणार
* संभाव्य किंमत 35, 000 रुपये.