आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टमध्ये लाँच होणार गॅलक्सी नोट -2

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी नोट -2 हा स्मार्टफोन येत्या ऑगस्टमध्ये सादर करण्यात येणार आहे. सॅमसंगच्या या फोनच्या पहिल्या आवृत्तीने बाजारात धूम केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्लिनमध्ये होणार्‍या आयएफए-2012 प्रदर्शनात गॅलक्सी नोट-2 सादर होण्याची शक्यता आहे. आधीच्या फोनपेक्षा नव्या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा आणि नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यात क्वॉड कोर प्रोसेसर लावलेला असेल. इंटरनल मेमरी 64 जीबी इतकी असेल. सॅमसंग नोट -2चा डिस्प्ले 5.5 इंच असेल, अशी आशा आहे.
सध्याच्या गॅलक्सी नोटचा डिस्प्ले 5.3 इंच आहे. नोट-2मध्ये अँड्राइडची अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टिम 4.1 जेली बीनचा उपयोग करण्यात येईल. याचा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा असेल. मात्र याची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
- 5.5 इंच डिस्प्ले
- 2 जीबी रॅम
- क्वॉड कोअर प्रोसेसर
- फुल टचस्क्रीन
- अँड्राइड 4.1 जेली बीन
- अनब्रेकेबल प्लेन टेक्नॉलॉजी डिस्प्ले
अँपलवर विजय- सॅमसंगने ब्रिटनमध्ये प्रतिस्पर्धी अँपलविरुद्ध पेटंट प्रकरणात कायदेशीर लढय़ात विजय मिळविला.