आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy Note 4, Galaxy Alpha And Iphone 6 Upcomming Launches

3 सप्टेंबरला लॉन्च होणार गॅलक्सी नोट 4; आयफोन 6 सोबत करणार स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्मक फोटो)
गॅजेट डेस्क - सॅमसंग कंपनी पुन्हा एकदा अॅपलच्या आयफोन 6 सोबत स्पर्धा करण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळेच कंपनी आपला बहूचर्चीत स्मार्टफोन गॅलक्सी नोट 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे आयफोन 6 हा 9 सप्टेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे, तोच सॅमसंगने गॅलक्सी नोट 4 ला IFA बर्लिन 2014 च्या आधीच 3 सप्टेंबरला लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षी सॅमसंगने गॅलक्सी नोट 3-4 सप्टेंबरला लॉन्च केला होता, तर दुसरीकडे आयफोन 5S आणि 5C हे 10 सप्टेंबरला लॉन्च केले होते.
* नोट 4 (3 सप्टेंबर) -
सॅमसंगने या इव्हेंटला 'एपिसोड 2' (भाग २) असे नाव दिले आहे. नोट 4 लॉन्च इव्हेंट तीन शहरात होणार आहे. यामध्ये बर्लिन (जर्मनी), बीजिंग (चीन) आणि न्यूयॉर्क (अमेरिका) या शहरांचा समावेश आहे. सॅमसंग आपल्या ग्रँड लॉन्चिंग इव्हेंटसाठी खुपच लोकप्रिय आहे. सॅमसंगने जे निमंत्रण पाठवले आहे, त्यामध्ये “Ready? Note the date!” असे लिहिले आहे. यामुळेच असा अंदाज लावण्यात येत आहे की, सॅमसंग नोट 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासोबत सॅमसंग या लॉन्च इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग युट्यूबद्वारेही करणार आहे.
* गॅलक्सी अल्फा (13 ऑगस्ट, अंदाजे तारीख)-
याशिवाय, सॅमसंग आपला फॅबलेट गॅलक्सी अल्फा 13 ऑगस्टला लॉन्च करण्याची शक्यता आहे. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सला आयफोन 6 चला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवले आहेत. सॅमसंग गॅलक्सी अल्फा या स्मार्टफोनची मेटल बॉडी असणार आहे. सॅमसंग गॅलक्सी अल्फा यावर्षीचा दुसरा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलक्सी अल्फाबद्दल सध्या अनेक अफवा पसरत आहेत.
Divyamarathi.com तुम्हाल सांगणार आहे, या स्मार्टफोनमधील चार फीचर्स जे गॅलक्सी अल्फामध्ये असू शकतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, गॅलक्सी अल्फाच्या अनुमानित फीचर्सबद्दल...

(नोट: सॅमसंग कंपनीकडून या दोन्ही फोन्सचे कोणतेही फोटो अधिकृतपणे जाहिर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बातमीत वापरण्यात आलेले सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)