आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्व्ह स्क्रीनचा SAMSUNG GALAXY NOTE 4; जाणून घ्या, संभाव्य फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सॅमसंग गॅलक्सी नोट 4 चे संभाव्य कर्व्ह स्क्रीनच्या मॉडेलचा फोटो)
गॅजेट डेस्क - मोबाईल फोन मेकर सॅमसंग कंपनीचा लॅटेस्ट स्मार्टफोन गॅलक्सी नोट 4 आज लॉ्न्च करण्याची शक्यता आहे. बर्लिनमध्ये होणार्‍या एका कार्यक्रम दरम्यान हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. मागील वर्षी सॅमसंगने गॅलेक्सी नोट 3 सुध्दा 4 सप्टेंबर 2013 ला बर्लिनमध्ये झालेल्या प्री -IFA या इव्हेंटमध्ये लॉन्च केला होता. प्रत्येक मोठ्या फ्लॅगशिप स्मार्टफोनप्रमाणेच गॅलक्सी नोट 4 मधील अनेक नवे फीचर्स आणि फोटो लॉन्चच्या पहिलेच लीक झाले आहेत.
दोन प्रकारात असेल हा फोन
मिळालेल्या माहितीनुसार गॅलक्सी नोट 4 हा दोन प्रकारात लॉन्च होईल. यामध्ये एकात फ्लॅट डिस्प्ले आणि दुसर्‍यामध्ये कर्व्हड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये YOUM तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान OLED डिस्प्ले स्क्रीनच्या स्मार्टफोन्सला अधिक फ्लेक्सिबल बनवते. सुरूवातीस हा फोन काही देशांमध्येच विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, सॅमसंग गॅलक्सी नोट 4 चे संभाव्य फीचर्स