सॅमसंगचा गॅलक्सी एस-3 / सॅमसंगचा गॅलक्सी एस-3 पुढील महिन्यात

वृत्तसंस्‍था

Apr 18,2012 05:45:34 AM IST

सियोल - सॅमसंगचा अतिलोकप्रिय स्मार्टफोन गॅलक्सी एस सिरीजच्या तिस-या पिढीतील मॉडेल येत्या मे महिन्यात जगभरातील बाजारपेठांत डेरेदाखल होणार आहे. लाँचिंगसाठी सॅमसंगने लंडन शहराची निवड केली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी लंडनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जात आहे. सॅमसंगच्या एस सिरीजने बाजारात पाऊल टाकताच जगभरातील मोबाइल मार्केटमध्ये विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले होते. याच सिरीजच्या जोरावर सॅमसंग जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने गॅलक्सी एस-2 मॉडेल बाजारात सादर केले होते.
गॅलक्सी एस-3ची वैशिष्ट्ये
मेमरी : 1.5 गीगाबाइट ऑफ रॅम, इंटर्नल स्टोअरेज मेमरीची क्षमता 32 जीबी असेल. एसडी कार्ड स्लॉटद्वारे क्षमता वाढवली जाऊ शकेल.
डिस्प्ले : 4.65 सुपर एएमओएलइडी -3 डिस्प्ले
कॅमेरा : 10 मेगापिक्सल कॅपॅसिटी
रेकॉर्डिंग : 60 एफपीवर 1080 पिक्सेल व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य
ओएस : आइस्क्रीम सँडविच विथ टचविझ 5.0
बॅटरी : 2250 एमएच बॅटरी
चीप : एनएफसी चीपयुक्त
4 कोटी गॅलक्सी फोनची आतापर्यंत विक्री
संभाव्य वैशिष्ट्ये : हा स्मार्टफोन बाजारात आतापर्यंत आलेल्या गॅलक्सी सिरीजसारखाच अत्यंत सुबक आहे. त्याच्या खालच्या भागात पाच टच सेन्सेटिव्ह बटन आहेत. त्याचा वापर मेन्यू, अ‍ॅप्स, बॅक आणि सर्च अ‍ॅप्लिकेशनसाठी होऊ शकतो. यात 4जी एलटीई कनेक्टिव्हिटीही मिळेल. नवा दहा मेगापिक्सलचा फ्लॅश कॅमेरा असू शकतो.

X
COMMENT