गॅजेट डेस्क - अमेरिकेच्या एका 13 वर्षाच्या मुलीने तिचा सॅमसंग गॅलक्सी S4 चार्जिंगला लावून आपल्या उशी खाली ठेवल्याने हा मोबाईल पुर्णपणे वितळला. अमेरिकेतील उत्तर टेक्सास मध्ये राहणार्या या मुलीने मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काही वेळातच तिला जळण्याचा वास आला. लगेच तिने उशी काढून मोबाईलकडे पाहिले तर मोबाईल जळाला होता, तर त्याचा अर्धा भाग हा वितळला होता.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, हा मोबाईल खुपच गरम झाला होता, त्यामुळे त्याची बॅटरीही फुगली होती आणि मग आग लागली. तर सॅमसंगच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की, या मोबाईलमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी डुप्लीकेट होती, त्यामुळेच ही बॅटरी वितळली.
वेबसाईट FOX 4 नुसार सॅमसंग कंपनीने आपल्या फोन बरोबरच ज्या ज्या वस्तूंचे नुकसान झाले त्या सर्व बदलून दिल्या आहेत. त्या सोबतच कंपनीकडून सांगण्यात आले की, आम्ही मोबाईलच्या युजर मॅन्यूअलमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, मोबाईल चार्जींग होत असताना हवा खेळती असावी.
भारतातही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
स्मार्टफोनमधील बॅटरीत काहीतरी खराबी आल्याने फोनचा स्फोट झाल्याची एक घटना घडली आहे. तर नोकीयाने त्यांच्या BL 5C बॅटरीच्या सिरिजमध्ये खराबी असल्याने सर्व मोबाईल हॅंडसेट्स बदलून दिले होते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या.. का होतात फोनमध्ये स्फोट, तसेच भारतात सॅमसंग गॅलक्सी 4 ची किंमत आणि त्याचे फीचर्स