आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'SAMSUNG GALAXY S5\' ची लॉन्चिंग डेट निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंग मोबाइल कंपनीचा बहुप्रतिक्षित 'GALAXY S5' स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट निश्चित झाली आहे. बार्सेलोनामध्ये (स्पेन) येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या 'मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्स 2014' (MWC) मध्ये सॅमसंग आपला 'GALAXY S5' फोन सादर करणार आहे. या फोनसह अनेक अत्याधुनिक गॅजेट्स लॉन्च होणार आहेत. 'मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्स'मध्ये 24 फेब्रुवारीला सॅमसंग खास इव्हेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इव्हेंटला 'Samsung unpacked 5'चे टायटल देण्यात आले आहे.

'सॅमसंग गॅलेक्सी S5' हा 16 मेगापिक्सल कॅमेराने अद्ययावत राहणार आहे. शिवाय यात बिग स्क्रीनसोबत आय स्कॅनर सेंसरअसण्याची शक्यता आहे.

सॅमसंगला मागील सात वर्षांच्या तुलनेत यंदा कमी नफा झाला आहे. अॅपल आणि चीनी मोबाइल मार्केटमुळे सॅमसंगला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हाय बजेट स्मार्टफोनची मागणी वाढल्याने 'गॅलेक्सी S5' या नव्या पिढीच्या फोनसाठी सॅमसंगने खूप परिश्रम घेतले आहे. या फोनमधील फीचर्सबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'SAMSUNG GALAXY S5' बाबत..