आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Introduced Galaxy Note 3, Smart Watch, Note 10.1

सॅमसंगने गॅलेक्सी नोट 3, स्मार्टवॉच, नोट 10.1 केले बाजारात सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - मोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंगने बर्लिनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड शोमध्ये अनेक अद्ययावत उत्पादने सादर केली. व्यावसायिक स्पर्धेत नेहमीच अग्रेसर असलेल्या सॅमसंगने आपल्या लोकप्रिय गॅलेक्सी मालिकेतील नोट 3 स्मार्टफोन, गॅलेक्सी गिअर स्मार्टवॉच आणि गॅलेक्सी नोट 10.1 टॅब्लेट लाँच केला.


भारत आणि इतर देशांत केव्हा लाँच :
नोट -3 जगभरातील 149 देशांमध्ये 25 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. यात भारताचाही समावेश आहे. मात्र, कंपनीने तूर्त त्याच्या किमतीची माहिती दिलेली नाही.


गॅलेक्सी नोट 10.1
सॅमसंगने गॅलेक्सी नोटचे 10.1 हे नवे मॉडेल सादर केले आहे. हा टॅब्लेट अवघा 7.9 मिलिमीटर जाड आहे. त्याचे वजन 535 ग्रॅम आहे. यात 3 जीबी रॅम आणि 2560 x 1600 रिझोल्युशनयुक्त स्क्रीन आहे. नोट 3 आणि गॅलेक्सी गिअरप्रमाणेच हा टॅब्लेटही 25 सप्टेंबर रोजी बाजारात दाखल होईल.